क्राईम

 जबरी चोरी करणारे तिन आरोपी ताव्यात, 5,60,000/- रुपये नगदी व दोन मोटार सायकल जप्त

 

पोलीस ठाणे कुंटूंर हद्यीत नायगाव तहसील समोर नांदेड ते नर्सी जाणारे रोडवर दिनांक 30/05/2023 रोजी सायंकाळच्या सुमारास अनोळखी चोरटयांनी दोन मोटार सायकलवर येवुन इसम नामे युवराज श्रीपतराव नेवळे वय 47 वर्ष रा. गाडीपुरा, नांदेड यांची कार आडवुन कारमधील त्याचेकडील नगदी 11,64,000/- रुपये खंजरचा धाक दाखवुन जबरीने चोरुन नेले होते. वगैरे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे कुंटूर गुरनं. 93/ 2023 कलम 392, 34 भा द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक 23/06/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारे आरोपी पैकी एक आरोपी मच्छीमार्केट, नायगांव येथे असल्याबाब माहीती मिळालेने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने मच्छीमार्केट, नायगांव येथे जावुन सापळा रचुन आरोपी नामे 1) लक्ष्मण बाबुराव जाधव वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा मच्छीमार्केट, नायगाव यास ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारपुस केली त्यांनी सांगीतले की, त्याचे टिपवरुन 2) बालाजी बाबुराव जाधव रा. नायगाव 3) गजानन व्यंकट पिटलेवाड रा. शिवनगर, नांदेड 4) प्रवेशकुमार ऊर्फ बबलू परशुराम गायकवाड वय 26 वर्षे व्यवसाय बेकार रा. बौध्दनगर, देगांव तां नायगाव 5) राधेश्याम पंजाबराव भालेराव वय 24 वर्ष रा. सखोजीनगर, नांदेड 6 ) एक विधीसंघर्षीत बालक असे मिळुन सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतले.
त्यावरुन नमुद आरोपी पैकी 1) प्रवेशकुमार ऊर्फ बबलू परशुराम गायकवाड वय 26 वर्षे व्यवसाय बेकार रा. बौध्दनगर, देगांव ता नायगाव 2) राधेश्याम पंजाबराव भालेराव वय 24 वर्ष रा. सखोजीनगर, नांदेड 3) लक्ष्मण बाबुराव जाधव वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा मच्छीमार्केट, नायगाव यांना ताब्यात घेतले आहे व एक विधीसंघर्षीत बालकाचे पालकास नोटीस देवुन पो स्टे कुंटूंर येथे हजर करण्याबाबत कळविलेले आहे. मिळुन आलेल्या आरोपीतांकडुन गुन्हयातील 5,60,000/- रुपये नगदी व गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल असा एकुण 7,60,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना पोलीस ठाणे कुंटूंर गुरनं. 93/2023 कलम 392,34 भाद. वि. गुन्हयाचे पुढील तपासकामी पो स्टे कुंटूर यांचेकडे देण्यात आले आहे. नमुद आरोपीताकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / जसवंतसिंघ शाहु, पोना/विठ्ठल शेळके, पोना/ बालाजी तेलंग, दिपक पवार, पोकॉ/ रणधीर राजबन्सी, तानाजी येळगे, मारोती मोरे, मपोह / सिमा भोयर, चालक अर्जुन शिंदे, स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button