क्राईम

अल्पवयीन बालकाकडुन चोरीच्या चार मोटरसायकली जप्त किंमती 2,60,000/- वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी

 

नांदेड शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये मोटरसायकली चोरीचे गुन्हयामध्ये वाद होत असल्याने मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री. सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे स्वाधीन अधिकारी च गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना देऊन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणावेत अशा सुचना दिल्या आहेत.
सदर सूचनांचे अनुषंगाने जगदीश भंडरवार, पोलीस अधिक्षक, नांदेड यानी वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी शिवराज जमदडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हयांचे घटनास्थळी भेट देऊन तेथील सिसिटीव्ही कॅमेरे चेक करुन आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे आज दिनांक 18.06.2023 रोजी सपोनि शिवराज जमदडे, पाना/2085 विजयकुमार नंदे, पोना / 152 मनोज परदेशी, पोकों / 3088 बालाजी कदम, पोकों/2896 शेख ईम्रान, पोकों / 3136 रमेश सूर्यवंशी, पोका 14 भाऊसाहेब राठोड, पोकों/2616 अरुण साखरे असे मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेत असतांना महाविर चौक येथे एक अल्पवयीन बालक आपले तान्यात बिनाक्रमांकाचे मोटरसायकल घेऊन जात असताना आढळुन आल्याने त्यास थांबवून चौकशी केली असता सदरची मोटरसायकल चोरीची असल्याचे स्पष्ट झाले, त्यारून आम्ही त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी ईतर तीन मोटरसायकली चोरी केल्याचे सांगितले. ज्याबाबत खात्री करता मी. उंबरवरा ता. जळकोट जि. लातूर येथुन एक होडा शाईन मोटरसायकल, मो. गाजुर ता. चाकुर जि.लातुर येथून दोन स्प्लेंडर मोटरसायकल अशा एकुण चार मोटरसायकली किमती 2,60,000/- रुपयाच्या हस्तगत केल्या आहेत.
सदर अल्पपयीन बालकास मोटरसायकल चोरी बाबत विचारणा करता त्यांनी सदर मोटरसाकली चोरून गावातील लोंकाना 500/- ते 1000/- रुपये उधारी पैसे घेवुन मोटरसायकली दिलयाचे सांगत आहे. नांदेड जिल्हामध्ये मोटरसायकल चोरी करणारे चोरटे हे मोटसायकली चोरी करुन त्या कमी
दरामध्ये कागदपत्र नंतर अनुणदेतो असे विविध बहाणे करून मोटरसायकली विक्री करीत असल्याची बाब बऱ्याचदा निदर्शनास आलेली आहे.
चोरीच्या मोटरसायकली खरेदी करणे हा दखलपात्र स्वरुपाचा गुन्हा असुन मोटरसयाकल विकत घेणारे इसमांना सुध्दा गुन्हयामध्ये आरोपी म्हणुन अटक केली जाते. त्यामुळे नांदेड शहरातील व जिल्हातील कोणाकडे विना कागदपत्र किंवा खोटे आश्वाशन देवुन मोटर सायकली खरेदी /निकी झाली असल्यास त्याची तात्काळ नजिकचे पोलीस स्टेशनला माहीती देवुन मोटरसायकली जमा कराव्यात व पोलीस कार्यवाही पासुन दुर रहावे अन्यथा आपणास नमुद चोरट्यासह गुन्हयामध्ये अटक होऊन कायदेशीर कार्यवाहीस तोंड दयावे लागेल असे पोलीस प्रशासनाकडुन अव्हाण करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button