मराठवाडा

नांदेड जिल्हा राजकीय प्रयोगशाळा बनू देऊ नका अशोकराव चव्हाण यांचे आवाहन- केंद्र-राज्य सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग

देगलूर, दि. 18- सध्याचे राजकारण खालच्या स्तरावर पोहोचले आहे. राज्यात जनाधार नसणाऱ्या कोणत्याही पक्षांनी यावे आणि टिकली मारून जावे अशी विदारक परिस्थिती सध्या जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा हा राजकीय प्रयोगशाळा बनू देऊ नका, असे आवाहन करतानाच केंद्र आणि राज्यातील सरकार लोकांच्या अपेक्षाभंग करणारे ठरले आहे, असा घणाघात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज (दि.18) येथे केला.

देगलूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करताना अशोकराव चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, आ. जितेश अंतापूरकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, काँग्रेसच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डॉ. सौ. मीनलताई खतगावकर, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, जि.प.चे माजी सभापती माधवराव मिसाळे, माजी सभापती ॲड.रामराव नाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर, शहराध्यक्ष शंकर कंतेवार, सेवादल जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, मागासवर्गीय सेल चे जिल्हा अध्यक्ष प्रा.मनोहर पवार,प्रवक्ते संतोष पांडागळे , सरचिटणीस नारायण श्रीमनवार,यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पुढीलवर्षी होणार आहेत. तर, त्याआधी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. नांदेड जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडी लक्षात घेता आपला जिल्हा राजकीय प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. राजकारणाला टाइमपास न समजता डोळ्यात तेल घालून राजकारणात सक्रिय राहावे, असा कानमंत्रही अशोकराव चव्हाण यांनी यावेळी दिला. प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यावेळी म्हणाले, की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई येथे नुकतीच बैठक झाली.

 

 

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे आगामी लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात जो उमेदवार देतील, त्या उमेदवाराच्या पाठीशी काँग्रेस व महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहावे. या बैठकीला ॲड. प्रीतम देशमुख, नंदकिशोर दाशेटवार, बालाजी टेकाळे, मंगल पाटील देगावकर, डॉ. धुमाळे, उमेश पाटील हाळीकर, गिरधर पाटील सुगावकर, तारकांत पाटील नरंगलकर, माजी नगरसेवक महमूद भाई, सुशीलकुमार देगलूरकर, अनिल बोनलावार, बालाजी पाटील थडके, बसवराज पाटील वन्नाळीकर, पिंटू पाटील, शीतलताई अंतापूरकर, मधुमती धोंगडे, संजय तुनसुरे, हाफीजखान पठाण, शिवकुमार ताडकुले, नंदाताई देशमुख, बाळू काब्दे, फिरदोस फातिमा, भावना दासेटवार, संतोष उन्ग्रतवार, ॲड. वीरेंद्र पाटील, सोशल मीडिया प्रमुख रुपेश पाटील,एकनाथ टेकाळे, एकनाथराव पाटील वडगावकर, धोंडीबा मिस्त्री, पाशाभाई बाटको, नितेश पाटील भोकसखेडकर, जनार्दन बिरादार, प्रकाश अमृतवार, दिनेश मुनगीलवार, डॉ. शिकारे, पंडित वाघमारे, अजय वानखेडे, खुशाल पाटील अंबुलगेकर, बालाजी चप्पलवार यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

अशोकराव चव्हाण आपले कॅप्टन- खतगावकर
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण राज्याचे खंबीर नेते आहेत. ते आपले कॅप्टन आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांची प्रेरणा घेऊन सोशल मीडियाचा वापर करून तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ते आता जनतेला कळून चुकले आहे. येणाऱ्या काळात देशात व राज्यात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. सध्याच्या जिल्ह्याच्या खासदारांनी एक किलोमीटरचा राष्ट्रीय रस्ता केल्याचे दाखवून द्यावे, असे आव्हानही भास्करराव पा. खतगावकर यांनी खासदारांना दिले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button