स्पोर्ट्स
दर्जेदार विकास कामे करण्यावर भर: आ. डॉ.राहुल पाटील. रामकृष्ण नगरात ओपन जिमचे लोकार्पण
परभणी : मोहम्मद बारी जिल्हा प्रतिनिधी
विकास कामात कुठलेही राजकारण न करता मतदारसंघाच्या विकासासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे़त,विकास कामांसाठी शासनाकडून खेचून आणलेल्या निधीतून दर्जेदार कामे करण्यावर आपला भर आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केले.
शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील रामकृष्ण नगर भगवा चौक येथे आमदार डॉ.पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून साकारण्यात आलेल्या ओपन जिम व बालगोपाळांसाठी बसवलेल्या खेळणीसह उद्यानाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सायंकाळी पार पडला.यावेळी आमदार डॉ.पाटील बोलत होते
श्री महारुद्र हनुमान मंदिरासमोरील मैदानात युवक, युवती, महिलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आमदार पाटील यांच्या संकल्पनेतून ओपन जिम साकारण्यात आली आहे़ तसेच परिसरातील लहान मुलांसाठी अद्यावत खेळणी बसवण्यात आली आहे़ याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, माजी जिल्हा प्रमुख राजू कापसे, संदीप भंडारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, माजी नगरसेवक प्रशास ठाकूर, नवनीत पाचपोर, गजानन काकडे, जेष्ठ नागरीक विजय कुलकर्णी, नारायण शेरे, गोविंदराव चौथाईवाले, रमेश शेरे, उपशहर प्रमुख राहुल खटींग, संभानाथ काळे, रामजी तळेकर, अंगद अंबोरे, युवासेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर, विशू डहाळे, गणेश मुळे, स्वप्निल भारती आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार डॉ.पाटील म्हणाले, परभणी मतदारसंघाच्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच विकास कामे करताना आपण राजकारण बाजुला ठेवून शहराच्या संपूर्ण विकासासाठी प्रयत्न करत असतो वसमत रोडवरील प्रभाग क्रमांक १५मध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नसताना आपण या प्रभागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे़, एवढेच नव्हेतर आपण दिलेल्या विकास निधीतून अनेक कामे पूर्ण देखील झाली आहेत. यापुढे देखील या प्रभागासाह संपूर्ण शहरातील विकासासाठी निधीची कुठलीही कमतरता भासू देणार नाही शहरातील कुठल्याही विकास कामाबाबत आपण सदैव प्रयत्नशील आहोत, शहरात जास्तीत जास्त विकास कामे कशी करता येईल यावर आपला भर राहणार असल्याचे आमदार डॉ.पाटील यांनी सांगितले. यावेळी ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळणी बसवल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार डॉ.पाटील यांचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपशहर प्रमुख मारुती तिथे यांनी केले होते. लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोपाळ चौथाईवाले, राजेश कच्छवे, रंजीत वर्मा, राजू देवस्थळे, बालाजी धंपलवार, सारंग शेरे, विनोद धर्माधिकारी, बंडू सोसे, उमाकांत मसारे, ज्ञानू दुधाटे, आनंद शांडील्य, काशिनाथ हलकुडे, चैतन्य मित्रे, राजू बनसोडे, नाना घाटूळ, सुमित कुलकर्णी, आकाश कच्छवे व शिवसेना, युवासेना पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले. या लोकार्पण सोहळ्यास रामकृष्ण नगर परिसरातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.