कृषी
विभागीय आयुक्तांनी स्वतः शेतात केली फवारणी
परभणी : मोहम्मद बारी जिल्हा प्रतिनिधी
मराठवाड्याचे महसूल विभागीय आयुक्त तथा झरीचे सुपुत्र सुनील केंद्रेकर हे आपल्या वेगळ्या शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. विशेषतः महसूल खात्यातील कामांचा प्रचंड ताण असतानाही केंद्रेकर यांना शेती विषयी अत्यंत आवड आहे.वेळात वेळ काढून ते गावाकडे,शेताकडे,आवर्जून भेट देत असतात.. इतर दिवशीही सायंकाळच्या वेळेस शेतीत काय कामी झाली याचा डिटेल वृत्तांत त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्यांच्या वडिलांचे वय साधारण 85 ते 90 वर्षे असतानाही ते दररोज शेतीत येतात हे विशेष.
कुठे शाळेवर भेट दे, तर कुठे पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट दे, हा केंद्रकर यांचा अत्यंत आवडीचा उपक्रम. वेगळी शैली असल्यामुळे ते सरकारी यंत्रणेत,नागरिकांत सुपरिचित आहेत.
झरी (तालुका परभणी) परिसरात त्यांची स्वतःची शेती असल्यामुळे ते शेतीवर सुट्टीच्या दिवशी येतात व जातीने लक्ष देतात, उन्हाळी टरबुजाची लागवड ही त्यांनी केली आहे, शनिवारी भेटीत पिके व फळांची पाहणी केली.
त्यावेळी टरबुजांच्या फवारणी करण्याचा मोह आवरला नाही. सरळ केद्रकर यांनी पाठीवर पंप घेऊन त्या टरबुजांची फवारणी केली.
नुसत्या शेतीवर नाही तर आपल्या गावावरही त्यांचे तसेच लक्ष आहे. कोविडच्या काळात काळात त्यांनी गावात प्रत्येक वेळेस भेट देऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
गावातील एखाद्या व्यक्ती औरंगाबाद या ठिकाणी दवाखान्यामध्ये ऍडमिट असल्यास अनेक वेळा त्यांनी आपल्या घरून त्यांची जेवणाची सोय केली. स्वतः डबा घेऊन दवाखान्यात हजर राहिले.
सध्या स्थितीला शैक्षणिक पद्धतीवर त्यांनी विशेष नाराज तयार करून शिक्षकांचीच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे, भूमिपुत्र यांचे झरी परिसरात स्वागत होत आहे.