डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी लाभार्थी निवडीकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड,19- अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत नवीन विहीर व ईतर बाबीसाठी सन 2024-25 करीता लाभार्थी निवडीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) सन 1982-83 पासून राबविण्यात येत होती. बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमीनीतिल ओलावा टिकवुन ठेवण्याच्या दृष्टीकोनातून सध्याची प्रचलीत असलेली विशेष घटक योजना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या नावाने सन 2016-17 पासून राबविण्यास शासनाने शासन निर्णय क्रं. विघयो-2016/प्रक्र.176/4ओ दि.05.01.2017 अन्वये मान्यता दिलेली आहे. व अनुसूचित जमातीसाठी अदिवासी उपयोजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेर) सन 1992-93 पासुन राबविण्यात येत होती. सदर योजना बदललेल्या परिस्थितीत शेतक-यांची आवश्यकता विचारात घेता सन 2097-98 पासुन सुधारीत करण्यास शासनाने शासन निर्णय क्रं. आउयो 2416/प्रक्र177/4ओ. दिनांक 08.09.2017 अन्वये प्रशासकिय मान्यता दिलेली आहे. व दिनांक 30.12ण्2017 चे शासन निर्णय पुरक पत्रान्यये सदर योजना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत / क्षेत्राबाहेर) या नावाने राबविण्यास मान्यता दिली आहे.
यामध्ये नवीन विहीरीसाठी 2 लाख 50 हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, इनवेल बोअरींगसाठी 20 हजार रुपये, पंप संच- 20 हजार, वीज जोडणी आकार- 10 हजार, शेततळयांचे प्लॅस्टीक अस्तरीकरणसाठी एक लाख रुपये, सुक्ष्म सिंचनामध्ये ठिबक सिंचनासाठी 50 हजार तर तुषार सिंचनासाठी 25 हजार रुपये, परसबाग (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत अनु. जमाती साठी) पाचशे रुपये, पीव्हीसी/एचडीपीई पाईप (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत अनु. जमाती साठी) 30 हजार रुपये (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत मंजुर असलेल्या मापदंडानुसार किमतीच्या 100 टक्के किंवा उच्चतम मर्यादा रु.30000/-)
सन 2024-25 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत लाभार्थी निवडीकरिता ऑनलाईन प्रस्ताव नविन विहीर व ईतर बाबीसाठी 7/12, होल्डीग, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, व बँक पासबुक ईत्यादी कागदपत्रासह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व कृषि विकास अधिकारी व्ही.आर. बेतीवार यांनी केले आहे.
लाभार्थी पात्रतेचे निकष
अर्जदार हा अनुसूचित जाती / नवबौध्द, अनुसूचित जमातीचा शेतकरी असला पाहिजे., अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. अर्जदाराकडे त्याच्या स्वतःचे नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहीजे. अर्जदाराच्या नावे जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे बैंक खाते असणे व सदर बैंक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1,50,000/- चे मर्यादेत असावे. अशा शेतकऱ्यांनी संबंधीत तहसिलदार यांचेकडून मागील वर्षीचे उत्पन्नाचा अद्यावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.