श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला देवस्वारी व पालखी पूजनाने आजपासून सुरुवात कृषी प्रदर्शन व विविध स्टॉलचे उद्घाटन
नांदेड, 9- दक्षिण भारतातील प्रसिध्द असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथील श्री खंडेरायाच्या यात्रेला आज बुधवार दिनांक 10 जानेवारी रोजी देवस्वारी व पालखी पूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायतीराज मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीशजी महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंतभाऊ पाटील, खासदार सुधाकराव शृंगारे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार शामसुंदर शिंदे पाटील, आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार राजेश पवार, आमदार रितेश अंतापुरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे यांची उपस्थिती राहणार आहे.
दुपारी 3 वाजता महिला व बालकांसाठी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार जितेश अंतापुरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव मंजुषा जाधव-कापसे, उप मुख्य कार्यकारी रेखा काळम-कदम, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, जिल्हा कोषागार ज्योती बगाटे यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
भव्य कृषी प्रदर्शन व कृषीनिष्ठ शेतक-यांचा सत्कार
माळेगाव यात्रेत आज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने सायंकाळी 4 वाजता भव्य कृषी प्रदर्शन व कृषीनिष्ठ शेतक-यांचा सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधिकारी व्ही. आर. बेतिवार, बांधकामचे कार्यकारी अभियंता ए.आर. चितळे, जलसंवर्धन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एन. भोजराज यांची उपस्थिती राहणार आहे.
उद्या अश्व, श्वान, कुकुट प्रदर्शन व विविध स्पर्धा
उद्या गरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता माळेगाव येथे अश्व, श्वान, कुकुट प्रदर्शन व विविध स्पर्धेचे उद्घाटन खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून खासदार सुधाकरराव शृंगारे व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर. जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांची उपस्थिती राहणार आहे.