मनसे विद्यार्थी सेने तर्फे शिक्षणाधिकारी यांना निवेदन
प्रतिनिधी (अमर गोधने)नांदेड: नांदेड जिल्ह्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या सि.बी.एस.ई. आणि स्टेट बोर्ड अशा अनेक शाळा पहिली ते बारावी पर्यंत सुरू असून या सर्व शाळांच्या वेळापत्रकामध्ये योग्य ताळमेळ दिसून येत नाही. काही शाळा सकाळी ७ वाजता सुरू होत असून काही शाळी सकाळी ८ वाजता सुरू होतात, तर काही शाळा दुपारी १२ वाजता पासून सुरू होत आहेत. ज्या शाळा सकाळी ८ वाजता सुरू होतात त्या शाळेत जाणाऱ्या मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यांना सकाळी खेळण्यासाठी वेळ भेटत नाही. त्या मुलांना सकाळी व्यायामासाठी वेळ मिळत नाही.
अशा मुलांमध्ये लठ्ठपणा व ईतर आजारांचे प्रमाण वाढत असून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन यांच्या नियमावली प्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा या १० ते ४ या वेळेत सुरू होत असून तोच नियम इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांना लागू करणे गरजेचे आहे. आपण तात्काळ नांदेड जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळी १० ते ४ याच वेळेत ठेवण्यात यावा असा संदेश निर्गमित करून सहकार्य करावे अश्या आशयाचे निवेदन
मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राम जाधव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
मनसे जिल्हा अध्यक्ष मॉन्टीसिंद्य जहागीरदार, शहर अध्यक्ष मनसे अब्दुल शफिक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिकेतसिंह परदेशी, व मनसे शहर सचिव महेश ठाकूर यांच्या उपस्थित मध्ये विद्यार्थी सेना जिल्हा सचिव विकीसिंघ कारपेंटर, हेमंत पांचाळ शहर उपाध्यक्ष, विद्यार्थी शहर सचिव शिवा कल्याणकर, कृष्णा राठोड,संघरत्न जाधव आदी जन यावेळी उपस्थित होते.