देश विदेश

गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल

 

भुसावळ विभाग, मध्य रेल्वे मधील जळगांव-मनमाड दरम्यान नांदगांव रेल्वे स्थानकावर दिनांक 29 मे ला दुपारी 15.30 ते 30 मे ला दुपारी 15.30 वाजे पर्यंत 3 र्‍या लाइनसाठी यार्ड रीमॉडेलिंगच्या प्री-NI आणि नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे 24 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे, यामुळे नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या पुढील गाड्या अकोला मार्गे वळविण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे : –

● गाड्यांच्या मार्गात बदल 

1) दिनांक 30 मे रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12753 नांदेड — हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्कक्रांती सुपरफास्ट एक्सप्रेस, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगांव, भुसावळ मार्गे न धावता हिंगोली, अकोला , मलकापुर, भुसावळ बायपास लाईन मार्गे धावेल.

2) दिनांक 29 मे रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 नांदेड — अमृतसर सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगांव, भुसावळ मार्गे न धावता हिंगोली, अकोला, मलकापुर, भुसावळ बायपास लाईन मार्गे धावेल.

3) दिनांक 30 मे रोजी अमृतसर येथून सुटणारी गाडी क्रमांक 12716 अमृतसर-नांदेड सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस, भुसावळ स्टेशन,जळगांव, चाळीसगाव, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे न धावता भुसावळ बायपास लाईन, मलकापुर, अकोला, हिंगोली मार्गे धावेल.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button