मराठवाडा

हिंगोली: बोथी तलावामध्ये पोहताना तरुण बुडाला

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा: कळमनुरी तालुक्यातील बीथी तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेला एक तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला. ही घटना आज (दि.२०) दुपारी २ वाजता पडली. आखाडा बाळापूर पोलीस व गावक-यांनी सुरू केला आहे.

कळमनुरी तालुक्यातील बोथी येथील दीपक किशनराव मारकळ (वय 21) हा आज दुपारी त्याच्या मित्रासोबत बोधी तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. तलावाच्या पाण्यात पोहत असताना दीपक अचानक खोल पाण्यामध्ये गेला. यावेळी पाण्यात बुडत असताना त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. दीपक पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या मित्राने त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.
दरम्यान, या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोडले, जमादार हिवरे, वानोळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिस व गावकऱ्यांनी पाण्यात बेपत्ता झालेल्या दीपकचा शोध सुरू केला आहे. दुपारी चार वाजेपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button