अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी आदिलाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी केली
श्री अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागातील आदिलाबाद – मालटेकडी विभागाची आज म्हणजेच २८ एप्रिल २०२३ रोजी पाहणी केली. त्यांच्यासोबत श्रीमती. नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग आणि मुख्यालय आणि विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी संपूर्ण तपासणी दरम्यान उपस्थित होते.
श्री अरुण कुमार जैन यांनी आदिलाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी सुरू केली त्यामध्ये त्यांनी सर्कुलेतिंग एरिया, पार्किंग सुविधा, अनारक्षित तिकीट प्रणाली सुविधा, प्रवासी आरक्षण प्रणाली, वेटिंग हॉल, पे अँड यूज टॉयलेट आणि फूट ओव्हर ब्रिज इत्यादींची पाहणी केली. त्यांनी बेबी फीडिंग रूम, सामान्य वेटिंग हॉल आणि स्थानकावर उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत प्रवाशांशी संवाद साधला. त्यांनी पिट-लाइनच्या कामांची पाहणी केली. त्यांनी हेल्थ युनिट, नव्याने बांधलेल्या टाईप-2 रेल्वे क्वार्टर आणि रनिंग रूम मधील महिला खोलीचे उद्घाटन केले. त्यांनी रनिंग रूमची पाहणी केली आणि क्रूसाठी उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
जनरल मॅनेजरने क्रू बुकिंग लॉबीच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला ज्यामध्ये त्यांनी क्रू मॅनेजमेंट सिस्टम तपासले जेथे लोको पायलट आणि गार्ड्स ड्युटीसाठी बुक करतात. त्यांनी क्रू बुकिंग लॉबीमध्ये उपलब्ध श्वास विश्लेषक चाचणी यंत्रणा देखील तपासली. अनेक लोकप्रतिनिधींनी महाव्यवस्थापकांची भेट घेतली आणि प्रवाशांच्या सुविधा, थांब्यांची तरतूद इत्यादींबाबत निवेदन सादर केले, नंतर त्यांनी माध्यम कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
श्री अरुण कुमार जैन यांनी गुड्स साईडिंग, पिट-लाइन कामाच्या प्रगतीचीही पाहणी केली. नंतर त्यांनी आदिलाबाद आणि मालटेकडी स्थानकांदरम्यान मागील खिडकीची तपासणी केली. त्यांनी मालटेकडी स्थानकावरील गुड्स शेडच्या कामांची पाहणी व आढावा घेतला.