क्राईम
दोन गावठी पिस्टल, दोन जिवंत राऊंड व जबर दुखापतीच्या गुन्हयातील आरोपीस अटक
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी नांदेड शहरात व जिल्हयात अग्नीशस्त्राचा वापर करुन गुन्हे करणाऱ्या व अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, श्री व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे
करणारे व बाळगणाऱ्यास गुन्हेगारांची माहिती काढून आरोपीस अटक करण्यासाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.
पोलीस निरीक्षक श्री व्दारकादास चिखलीकर, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना गुप्त बातमीदाराकडून उपविभाग नांदेड शहर व उपविभाग देगलूर यांच्या हद्दीमध्ये आरोपीकडे गावठी पिस्टल असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन त्यांनी दोन पथके तयार करुन एक उपविभाग नांदेड शहर व एक उपविभाग देगलूर हद्दीत रवाना केले होते. उपविभाग नांदेड शहर हद्दीतील पथकाने नंदीग्राम सोसायटी येथे करणसिंग नानकसिंघ गिल, वय 23 रा. नंदीग्राम सोसायटी, नांदेड याचेकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती दिल्याने त्यास नंदिग्राम सोसायटी येथे जावून ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. त्यास पुढील तपासकामी पो.स्टे. विमानतळ यांचे ताब्यात दिले आहे.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील दुसऱ्या पथकाने उपविभाग देगलूर मधील पो.स्टे. मरखेल हद्दीत वझरफाटा येथे अनिकेत बालाजी सुर्यवंशी, वय 23 वर्ष, रा. पोचम्मा मंदिराच्या पाठीमागे, दत्तनगर, नांदेड यास ताब्यात घेवून त्याच्या जवळ बाळगून असलेले एक गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त केले आहे. त्यास पुढील तपासकामी पो.स्टे. मरखेल यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
पो.स्टे. लिंबगांव गुरनं 46 / 2023 कलम 326,34 भादंविसह 4/25 शस्त्र अधिनियमाप्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयातील फरार आरोपी नामे खुशालसिंह नानकसिंघ गिल, वय 20 वर्ष, रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड हा आण्णाभाऊ साठे चौकात असल्याची माहिती मिळाल्यावरुन त्यास आण्णाभाऊ साठे चौकात ताब्यात घेवून पो.स्टे. लिंबगांव यांचे स्वाधीन केले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नादेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड, सपोनि पांडूरंग माने, पोउपनि सचिन सोनवणे, पोउपनि जसवंतसिंघ शाहू सपोउपनि माधव केंद्रे, सपोउपनि मारोती तेलंगे, पोहेकॉ गंगाधर कदम, पोहेकॉ गुंडेराव करले, पोना / बालाजी तेलंग, पोका / तानाजी येळगे, मोतीराम पवार, गणेश धुमाळ, विलास कदम, महेश बडगू, बालाजी यादगीरवाड व चापोकॉ/ गंगाधर घुगे, हेमंत बिचकेवार, हनुमान ठाकूर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.