जिला

व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना धर्माबादची नूतन कार्यकारणी जाहीर!

 

धर्माबाद- म. मुबशिर

राष्ट्रीय पातळीवर 28 राज्यात पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर सक्षमपणे उपाययोजना करणारी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, उपाध्यक्ष म्हणून उभरते पत्रकार दत्तात्रय सज्जन तर सचिव म्हणून राजेश सोनकांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

येथील शासकीय विश्रामगृहावर ज्येष्ठ पत्रकार गंगाधर धडेकर, संपादक डॉ. सुधीर यलमे, सुरेश घाळे, पांडुरंग पांचाळ, दत्तात्रय सज्जन, राजेश सोनकांबळे, गंगाप्रसाद सोनकांबळे, संजय झगडे, गंगाधर आलूरोड, नारायण इबितवार, अशोक पडोळे, जकियोद्दीन सर,अहमद लढ्ढा, म.मुबशिर, कृष्णा जाजेवार,या मानांकित पत्रकारांचा उपस्थितीत व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची बैठक संपन्न झाली.

सर्वानुमते विचार विनिमय करून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये कोषाध्यक्ष म्हणून गंगाप्रसाद सोनकांबळे, संघटक म्हणून पांडुरंग पांचाळ, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुरेश चाळे, तर सदस्य म्हणून गंगाधर आलूरोड, नारायण इबितवार, संजय झगडे, अशोक पडोळे ,जकीयोद्दीन सर, व गजानन कुरुंदे यांची निवड करण्यात आली.

बहुभाषिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गंगाधर धडेकर तथा संपादक सुधीर येलमे यांनी यावेळी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
चौकट उपरोक्त संघटनेचे नांदेड महानगराध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांनी फोनवर तब्बल दहा मिनिटे उपरोक्त संघटनेची माहिती देत संघटनेची ध्येयधोरण समजावून सांगत नूतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.

उपरोक्त संघटनेच्या कार्यकारणीस रमेश गौड, जे.के. जोंधळे, डॉ. लक्ष्मीनारायण केशवार, प्राचार्य कणसे, माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्यासह सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button