क्राईम

गावठी पिस्टलसह एकास अटक पोलीस ठाणे वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीमध्ये घडलेल्या गोळीबार घटनेच्या अनुषंगाने मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. चंद्रसेन देशमुख उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर, मा. श्री. सिध्देश्वर भोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या सुचना दिल्या..
सदर सुचनांप्रमाणे मा. श्री. चंद्रसेन देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड, श्री. जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी शिवराज जमदडे, पोहेकॉ / दत्तराम जाधव, पोना/ मनोज परदेशी, पोना/ विजयकुमार नंदे, पोकॉ/ शेख ईम्रान शेख एजाज, पोका बालाजी कदम, पोकॉ/ रमेश सुर्यवंशी, पोकॉ/ भाऊसाहेब राठोड यांनी पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील शस्त्र बाळगणारे गुन्हेगारांची यादी तयार करुन त्यांना चेक करुन त्यांच्या हालाचालीची माहीती घेत असतांना एकुण 27 गुन्हेगारांना चेक केले.
दरम्याण काल दिनांक 04.04.2023 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, गोवर्धनघाट स्मशानभुमीजवळ एक इसम आपले ताब्यात पिस्टल बाळगुन थांबला आहे. त्यावरुन सदर ठीकाणी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी छापा मारुन त्या ईसमास पकडले. त्यास त्याचे नांवगांव विचारणा करता त्यांनी आपले नांव शेख महेफुज शेख सलीम, वय 19 वर्षे रा. खुशीनगर कौठा नांदेड असे सांगितले. सदर इसमाने बिनापरवाना, बेकायदेशिररित्या गावठी पिस्टल स्वतःचे ताब्यात बाळगलेला मिळुन आल्या प्रकरणी पोना मनोज परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि शिवराज जमदडे हे करीत आहेत.
अवैद्य शस्त्र बाळगल्या प्रकरणी नमुद ईसमास अटक करुन गुन्हा दाखल केल्या प्रकरणी
वरीष्ठांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button