जिला

मा. पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांचे हस्ते सायबर जनजागृती रथाचे उदघाटन

नांदेड / अलीकडील काळात ऑनलाईन व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे घडून जनतेची आर्थिक फसवणुक होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. सदरच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आर्थीक व्यवहार तसेच सोसल मिडीयाचा वापर करताना कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्ठी करू नये, याबाबत जनतेमध्ये सायबर गुन्हयाबाबत जनजागृती करण्यासाठी मा. श्री डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड, परिक्षेत्र नांदेड यांचे मार्गदर्शनखाली मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांचे संकल्पनेतुन क्वीकहिल फाउंडेशन व नांदेड पोलीस यांचे संयुक्त विधमाने सायबर सुरक्षा रथ तयार करण्यात आला आहे.
त्याचे आज रोजी मा. श्री डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड, परिक्षेत्र नांदेड यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. सायबर जनजागृती स्थाव्दारे मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे परिणाम, सोशल मिडीया व ऑनलाईन पेमेंट अॅप वापरताना कोण कोणती खबरदारी घ्यावी व आपली ऑनलाईन फसवणुक होणार नाही याबाबत कशाप्रकारे काळजी घ्यावी तसेच ऑनलाईन सायबर क्राईम कशा प्रकारे होतात जसे की सोशल मिडीयाचे प्रोफाईल लॉक न केल्यामुळे, आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी दिल्याने, कोणत्याही अनोळखी लिंकला क्लीक करून त्यावर आपले बँक खात्याची माहिती दिल्याने कश्याप्रकारे फसवणुक होते. याबाबत पथनाटय सादर करून सायबर जनजागृती करण्यात येणार आहे.
सायबर जनजागृती रथ नांदेड जिल्हयातील 36 पोलीस स्टेशनचे अंतर्गत शाळा, कॉलेज, महाविद्यालय व गर्दीचे ठिकाणी असे एकुण 128 ठिकाणी जावून जनतेमध्ये सायबर जनजागृती करणार आहे. यावेळी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, डॉ अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु) नांदेड, श्री व्दारकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा, नांदेड, श्रीमती अलका कहाळेकर, पोउपमनि, नांदेड परिक्षेत्र नांदेड यांचे स्टेनो, श्री शिवाजी लष्करे, सपोनि जनसंपर्क अधिकारी हे उपस्थित होते.
सायबर जनजागृती पथनाटयामध्ये क्वीकहिल फाउंडेशन तर्फे आधार सामाजिक विकास संस्था सातारा यांचे सुनिल नलावडे, मल्हारी जाधव, राजेंद्र मोरे, ऋत्विक रांस्ते, सुयश बाबर, किरण घोदे, गणेश महाजन इत्यादी कलाकारांनी भाग घेतला आहे.
सायबर पोलीस स्टेशनचे पोउपनि श्री जी. बी. दळवी, श्री सोपान थोरवे, पोलीस अंमलदार दिपक ओढणे, काशिनाथ कारखेडे व सायबर पोलीस स्टेशन, नांदेड विभागाचे अधिकारी अंमलदार यांनी अतिशय परिश्रम घेवून सायबर जनजागृती रथाचे नियोजन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button