मराठवाडा
शबीना याचा आयुष्यातील पहिला रोजा
परभणी 🙁 परभणी जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद बारी) मुस्लिम समाजातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र असा रमजान हा महिना असून परभणी येथील मदिना नगरातील शबीना सय्यद रफिक पेडगावकर वय सात वर्ष या मुलींने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला.
सध्या या वर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्णतेचा सर्वात जास्त तापमान असलेला मे महिन्यात आलेला हा रमजानचा महिना आणि त्या मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता ही उपवास ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रास होतो त्यात या सात वर्षांची चिमुकलीने पहिला रोजा ठेवून आपल्या इस्लाम धर्मातील परंपरा नुसार आयुष्याची सुरुवात आपल्या अल्हा समोर चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठेवला.
अशा उष्णतेच्या एवढ्या अवस्थेमध्ये सात वर्षाच्या वयात शबीना या चिमुकली ने आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल नातेवाईक स्तरातून अभिनंदन होत आहे आजोबा आजी आई-वडिल, अत्या, काका काकी , मामा, मामी चुलते, बहिन भाऊ आदिंसह मित्र परिवारांनी शुभेच्छा दिल्या शबीना ही सामाजिक कार्यकर्ते सय्यद रफिक पेडगावकर यांची मुलगी आहे.