आसाम सरकारतर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉ. पठान यांना समाजरत्न पुरस्कार जाहिर
नांदेड (जि.प्र.) – आसाम सरकार तर्फे संचलीत डॉ. बाबासाहेब इन्स्टीट्युट ऑफ ऐज्युकेशन संचालनालय आसाम मार्फत 2023 चे समाजरत्न पुरस्कार नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक नांदेड चौफेरचे संपादक तथा भारतसरकार एनजीओ समीतीचे सचीव डॉ. मोहम्मद आरेफखान पठान यांना जाहीर झाला असुन त्याचे पत्र त्यांना आजरोजी प्राप्त झाल्याचे डॉ. पठान यांनी कळविलेले आहे.
देशातील संविधानाचे जनक व निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती असुन याचे औचीत्य साधून दरवर्षी आसाम सरकार तर्फे साजरी केल्या जाते आणि त्या जयंती निमित्त देशाच्या कानाकोपर्यातुन सामाजीक चळवळीचा शोध घेतला जातो. ज्यांचे कार्य समाजपयोगी, निराधार, वृध्द अपंग, भ्रष्टाचार व भ्रष्टाचारासंबंधी वाचा फोडणे, जनतेचेमत, प्रतीक्रिया लेखनाद्वारे सरकारपर्यंत पोहचविणे या मुल्याकनातून नीवड केल्या जाते. ज्यामध्ये नांदेडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आरेफखान पठान या सर्वच क्षेत्रात मौलाची कामगीरी बजावलेली असल्याने त्या बाबतची नोंद आसाम सरकारने घेतलेली आहे. जो 14 एप्रिल जयंती समारोहात उपस्थित राहण्याचे पत्र 3-3-2023 रोजी प्राप्त झाले आहेत.
डॉ. मोहम्मद आरेफखान पठान यांना समाजरत्न पुरस्कार व रोख रक्कम 21 हजार रुपये देऊन आसाम सरकार तर्फे गौरविण्यात येणार असल्याचे पठान यांनी सांगीतलेले आहे. जो 75 व्या स्वातंत्र्य महोत्सवा निमित्त आझादी का अमृत महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्सट्युट ऑफ ऐज्युकेशन रिसर्च सेन्टर आसाम येथे आपली निवड झाली असुन या महोत्सवात डॉ. पठान यांना इंन्टरनॅशनल समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे असे सुचीत केलेले आहेत. हे माझे लेखनाचे आणि सामाजिक कार्याची पावती असून मला देशपातळीवर अनेक राज्यातून पुरस्कार मिळत असल्यामूळे मी आनंदीत असुन माझ्या लेखनाचे कार्य बाबासाहेबांच्या लेखनीतून व दिलेल्या अधीकारातून अधीक अभ्यास करुन प्रखर मते जनतेसमोर मांडुन त्या लेखनीद्वारे सोडवीण्याचे माझे कार्य अधीक वाढीला भरपूर वाव देणार असे सुतोवाच डॉ. पठान यांनी केले आहे.
भारत सरकारतर्फे एमएसई एनजीओ, नीती आयोगातर्फे मोहीम देश भरात राबविली जाते त्यामध्ये माझी निवड झाली असुन त्यात माझे भरपूर सहकार्य व योगदान देणार असुन तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम मी करणार आहे जो मला नेतृत्व करण्याची संधी दिली त्या संधीचे सोन करुन दाखवणार असल्याचे मत डॉ. मोहम्मद आरेफखान पठान यांनी व्यक्त केलेली आहे.