जिला

सीसीटीएनएस प्रणालीत नांदेडचा दबदबा कायम नांदेड जिल्हा पोलीस दलाने मिळवले राज्यात प्रथम स्थान

सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्हा पोलीस दलाची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. दरम्यान नुकत्याच लागलेल्या सीसीटीएनएस रेकिंग मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे यामुळे संपुर्ण राज्यात नांदेड जिल्हयाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.
मा. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कडुन पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरी बाबतचा आढावा दर महीन्यात घेण्यात येतो राज्यातील सर्व घटकांचे माहे फेब्रुवारी. 2023 मधील सीसीटीएनएस मासिक कामगिरी अहवालांचे अवलोकन करुन देण्यात आलेल्या गुणांकनानुसार नांदेड जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये नांदेड जिल्यातील 36 पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे प्रथमखबर घटनास्थळ पंचनामे आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोप पत्र न्यायालयीन निकाल हरवलेले इसम अनओळखी मयत, अदखलपात्र खबर, गहाळ / बेवारस मालमत्ता, प्रतीबंधक कार्यवाही व ईतर नोंदी अश्या एकुण 18 प्रकारच्या माहितीची सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये मध्ये वेळेत परिपुर्ण नोंदी करण्यात येतात. तसेच सीसीटीएनएस प्रणालीचा दैनदिन कामकाजात वापर करुन गुन्हे प्रतिबंध गुन्हे उघडकिस आणुन चांगली कामगिरी करण्यात आली तसेच ITSSO, ICJS, Cri- MAC व Citizan Portal वरील e-Complaint, ची वेळेत निर्गती व प्रभावीपणे वापर केल्याने माहे फेब्रुवारी 2023 मध्ये नांदेड जिल्हयाने 332 गुणांपैकी 327 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस नोडल अधिकारी मा. अपर पोलीस अधीक्षक नांदेड श्री अविनाश कुमार, मा. अपर पोलीस अधिक्षक भोकर डॉ. के. ए. धरणे व त्यांची सीसीटीएनएस टीम पोलीस उप निरीक्षक रहिम बशीर चौधरी, पोलीस उप निरीक्षक प्रणिता बाभळे, पोलीस नाईक समीरखान मुनीरखान पठाण, पोलीस नाईक ओंकार सुरेश पुरी, पोलीस कॉन्स्टेबल माधव नारायण येईलवाड यांचे परिश्रमामुळे नांदेड पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यासाठी मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी सीसीटीएनएस विभागाचे कोतुक केले आहे, तसेच भविष्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button