क्राईम

प्रेमी युगुलावर फायरिंग; प्रियकर गंभीर जखमी नांदेडच्या विष्णुपुरी परिसरातील घटना

नांदेड – शहराच्या विष्णुपुरी परिसरातील ग्रामीण तंत्रनिकेतनच्या पाठीमागे सोमवार दि. ३ एप्रिलच्या रात्री साडेसातच्या सुमारास एका प्रेमीयुगुलाला मारहाण करून नंतर प्रियकरावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र सुदैवाने पिस्तूलची गोळी त्याच्या बरगडीला लागल्याने त्याचा जीव वाचला । असून त्याच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नांदेड शहराच्या आजूबाजूला निर्जनस्थळी प्रेमीयुगुलाला पकडून लुटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या संदर्भात आजच “दैनिक गोदातीर समाचार” ने “नांदेड शहरातील निर्जनस्थळी प्रेमीयुगुल सॉफ्ट टार्गेट” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त अगदीच ताजे असतानाच विष्णुपुरी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंगोली शहरातील अकोला बायपास येथील शुभम दत्तात्रय पवार या प्रियकरावर अनोळखी एकाने पिस्तुलातून गोळी झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
अल्पवयीन असलेली प्रेयसी व तिचा प्रियकर शुभम दत्तात्रय पवार यांची मागील दोन वर्षापासून प्रेम मैत्री आहे. यातच ३ मार्च रोजी नमस्कार चौक येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आल्यानंतर शुभम पवार हा तिला फोन लावून (एमएच- 38- एए 4637) या दुचाकीवरुन विष्णुपुरी काळेश्वर येथे दर्शनाला घेऊन गेला. यापूर्वी हे दोघेजण हिंगोली, नांदेड या ठिकाणी अनेक वेळा भेटत होते. महादेवाचे दर्शन केल्यानंतर हे दोघेजण नांदेड ग्रामीण तंत्रनिकेतनच्या पाठीमागे जात असताना दबा धरून बसलेल्या एकाने त्यांना अडविले. दोघांना आधी मारहाण करण्यात आली. यावेळी अल्पवयीन असलेल्या मुलीलाही त्याने मारहाण करून शुभम पवार याच्या गळ्यातील चांदीची चैन आणि खिशातील नगदी दोन हजार रुपये काढून घेतले. तो विरोध करत असताना आरोपीने आपल्या जवळील पिस्तुलातून शुभमवर गोळी झाडली. यात ही गोळी शुभमच्या बरगडीला चाटून गेली आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर शुभम आणि त्याच्या मैत्रिणीने काही अंतरावर जाऊन रुग्णवाहिका 108 ला कॉल करून बोलावून घेतले. आणि विष्णुपुरी नांदेडच्या रुग्णालयात शुभम पवार याला भरती करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम 307. 394, 397, 3/25. 3/27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहराच्या आसपासचे निर्जन स्थळ आणि विष्णुपुरी परिसर पुन्हा चर्चेत आला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button