राजकोट-मेहबूब नगर- राजकोट विशेष गाडी मार्गे अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा, नांदेड
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून पश्चिम रेल्वे ने राजकोट ते मेहबूब नगर दरम्यान विशेष गाडीच्या 24 फेऱ्या चालविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे :–
1. गाडी क्र. 09575 राजकोट ते मेहबूब नगर विशेष गाडी : हि गाडी राजकोट रेल्वे स्थानकांवरून दर सोमवारी दुपारी 13.45 वाजता सुटेल आणि अहेमदाबाद, वडोदरा, भुसावळ, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, निझामाबाद, काचीगुडा, मार्गे महबूब नगर येथे मंगळवारी सायंकाळी 19.35 वाजत सुटेल.
हि गाडी एप्रिल महिन्यात 10, 17, 24 तारखेला, मे महिन्यात 01, 08, 15, 22, 29 तारखेला, जुन महिन्यात 05, 12, 19 आणि 26 तारखेला सुटेल. (12 फेऱ्या)
2. गाडी क्र. 09576 मेहबूब नगर ते राजकोट विशेष गाडी : हि गाडी मेहबूब नगर येथून दर मंगळवारी रात्री 21.35 वाजता सुटेल आणि काचीगुडा, निझामाबाद, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, भुसावळ, वडोदरा, अहेमदाबाद मार्गे राजकोट येथे गुरुवारी सकाळी 05.00 वाजता पोहोचेल.
हि गाडी एप्रिल महिन्यात 11, 18, 25 तारखेला, मे महिन्यात 02, 09, 16, 23, 30 तारखेला, जुन महिन्यात 06, 13, 20 आणि 27 तारखेला सुटेल. (12 फेऱ्या)
या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल असे 21 डब्बे असतील.