नांदेड ते एर्नाकुलम (केरळ) एक्स्प्रेस व पूर्णा ते तिरुपती ला मुदत वाढ
प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड विभागातून केरळ ला जाण्याकरिता नांदेड ते एर्नाकुलम दरम्यान नोवेंबर, डिसेंबर-2022 आणि जानेवारी-2023 महिन्यात विशेष गाडीच्या 26 फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. या गाडीला मिळालेल्या प्रतिसादामुळे या गाड्यांना मुदत वाढ देण्यात आले आहे, ते पुढील प्रमाणे —
अनु गाडी संख्या कुठून-कुठे प्रस्थान आगमन फेब्रुवारी-2023 फेऱ्या
1 07189 नांदेड ते एर्नाकुलम 15.00
दर शुक्रवारी 20.15 03 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 04
2 07190 एर्नाकुलम ते नांदेड 23.25
दर शनिवारी 07.30 04 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 04
1. गाडी क्रमांक 07189 नांदेड ते एर्नाकुलम (केरल) विशेष गाडी :गाडी संख्या 07189 हुजूर साहिब नांदेड ते एर्नाकुलम ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 03 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी, 2023 दरम्यान दर शुक्रवारी दुपारी 15.00 वाजता सुटेल आणि निझामाबाद, सिकंदराबाद, गुंटूर, रेणीगुंठा (तिरुपती), इरोड, कोईम्बतोर, थ्रीशूर मार्गे केरळ राज्यातील एर्नाकुलम येथे शनिवारी रात्री 20.15 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 07190 एर्नाकुलम ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी : गाडी संख्या 07190 हि विशेष गाडी एर्नाकुलम येथून दिनांक 04 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी, 2023 दरम्यान दर शनिवारी रात्री 23.25 वाजता सुटेल आणि थ्रीशूर, कोईम्बतोर, इरोड, रेणीगुंठा, गुंटूर, सिकंदराबाद, निझामाबाद, मुदखेड मार्गे नांदेड येथे रविवारी सकाळी 07.30 वाजता पोहोचेल.
या गाडीत स्लीपर, वातानुकुलीत आणि जनरल असे 18 डब्बे असतील.
प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड विभागातून पूर्णा ते तिरुपती दरम्यान नांदेड मार्गे विशेष गाड्या सुरु केल्या आहेत, प्रवाशांची मागणी लक्षात घेवून या विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, तो पुढील प्रमाणे —
अनु क्र. गाडी संख्या कुठून-कुठे प्रस्थान आगमन फेब्रुवारी-2023 फेऱ्या
1 07607 पूर्णा ते तिरुपती 12.40 (सोमवार) 07.30 (मंगळवार)
06, 13, 20, 27 04
2 07608 तिरुपती ते पूर्णा 20.15 (मंगळवार) 15.00 (बुधवार)
07, 14, 21. 28
04
1. गाडी क्रमांक 07607 पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी : ही विशेष गाडी दिनांक 06, 13, 20, 27 फेब्रुवारी, 2023 ला पूर्णा रेल्वे स्थानकावरून दर सोमवारी दुपारी 12.40 वाजता सुटेल आणि नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेड्डी, मेडचल, सिकंदराबाद, पगाडीपल्ली, नालगोंडा, मिर्याल्गुदा, नदीजुडी, सत्तेनापल्ली, गुंटूर, तेनाली, बापटला, ओंगोल, नेल्लोर, गुडूर, श्रीकाल्हास्ती, रेणीगुंठा मार्गे तिरुपती येथे मंगळवारी सकाळी 07.50 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 07608 तिरुपती – पूर्णा स्पेशल ट्रेन: ही विशेष गाडी दिनांक 07, 14, 21. 28 फेब्रुवारी, 2023 ला तिरुपती रेल्वे स्थानकावरून दर मंगळवारी रात्री 20.15 वाजता सुटेल, रेणीगुंठा, श्रीकाल्हास्ती, गुडूर, नेल्लोर, ओंगोल, बापटला, तेनाली, गुंटूर, सातेनापल्ली, नदीकुडी, मिर्याल्गुदा, नालगोंडा, पगाडीपल्ली, सिकंदराबाद, मेडचल, कामरेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड आणि नांदेड मार्गे पूर्णा येथे बुधवारी दुपारी 15.10 वाजता पोहोचेल.