क्राईम

देगलुर पोलीसांनी लावला खुनाच्या गुन्हयाचा छडा…..

पोलीस ठाणे देगलुर येथे दिनांक 24.01.2023 रोजी फिर्यादी नामे श्रीपतराव रामजी पाटील, वय 90 वर्षे व्यवसाय वयोवृध्द रा. लालबहादुर शास्त्रीनगर उदगीर रोड देगलुर यांनी दिनांक 24.01.2023 रोजी पोस्टे दंगलुर येथे तक्रार दिली की. दिनांक 23.01.2023 राजी रात्री 11.30 वा. चे सुमारास त्यांची पत्नी चंद्रकलाबाई श्रीतराव पाटील हीयेत घरी झोपला असतांना अंदाजे 20-30 वर्षे वयाचे तीन अनोळखी इसमांनी घरात येऊन श्रीपतराव पाटील यांचे पाय कपडयाने बांधुन व त्यांची पत्नी चंद्रकलाबाई हीचे पाय व तोंडावस कपडयाने बांधुन तीचा खुन करून घरातील 1) मयताचे अंगावरील सोन्याचे मनी मंगळसुत्र 10 ग्रॅम वजनाचे 2) मयताचे अंगावरील सोन्याची बोरमाळ 15 ग्रॅम वजनाची 3) हातातील सोन्याच्या पाटल्या 50 ग्रॅम वजनाच्या 4 ) कपाटातील सोन्याचे कडे 50 ग्रॅम वजनाचे 5)चांदीचे 70 ताळयाचे वाळे असे सोन्या चांदीचे 3,89,000 /- रूपयाचे दागिणे जबरीने चोरून नेले आहेत. तक्रारीवरून पोस्टेला गुरन 39 / 2023 कलम 302, 397, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर गुन्हयातील अनोळखी आरोपीतांचा शोध घेणे कामी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा. सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देगलुर यांचे नेतृत्वात
1) पोलीस निरीक्षक सोहन माछरे, पोलीस ठाणे देगलुर, सपोनि आनंद माळाळे, सपोनि संगमनाथ परगेवार, पोउपनि श्रीकांत मोरे, रवि मुंढे, पुनम सुर्यवंशी, कांबळे, सपोउपनि मिरदोडे, पोहेकॉ कनकवळे, इंगोले, जोगे, कासीन, जावेद शेख, पीना सुनिल पत्रे, तलवारे, पोकों मलदोडे, एमलवाड, मोरे, धुळे, शिंदे, मोटरगे, बेग, सोनेकर जगताप, नागमवाड, ड्रायव्हर महाजन,
2) स्थागुशा नांदेड येथील पोनि श्री द्वारकादास चिखलीकर, सपोनि माने, पोउपनि बोराटे, पोहेकॉ मुंडे, करले.
3) पोलीस स्टेशन मुखेड येथील पोनि विलास गोबाडे, पोउपनि भारत जाधव, व पथक 4) पोलीस स्टेशन मरखेल येथील सपोनि मद्दे, पोहेकॉ बारी, पोकों यंगाले 5) पोलीस स्टेशन मुक़ामाबाद येथील पोउपनि श्री वाघमारे, कागणे, पोना मरगेवार, शिंदे
अशी शोध पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने देगलुर मरखेली, करडखेड, मुक्रामाबाद, तसेच कर्नाटक राज्यातील वडगाव औराद, संतपुर येथील जवळपास 96 तासाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक बाबीचे विश्लेषन केले. या पथकांना पोलीस निरीक्षक श्री नानासाहेब उबाळे, पोउपनि श्री दळवी, पोहेकॉ ओढणे, पोहेकॉ सिटीकर, सायबर पोलीस स्टेशन यांनी महत्वपुर्ण तांत्रीक सहाय पुरविले.
पोउपनि श्र रवि मुंढे, मोरे, व पोना सुनिल पत्रे यांना मिळालेल्या गोपनिय माहिती अधारे, सीसीटीव्ही मधील आरोपीतांची ओळख पटवुन गुन्हयात सहभागी असणारे गुन्हेगार निष्पन्न केले आहे.
मयत चंद्रकलाबाई श्रीपतराव पाटील यांच्या बाबत त्यांचा भाचा शहाजी मरतळे यांने अन्य आरोपीतांना माहिती दिली. त्यानंतर आरोपीतांनी कट करून गुन्हयाचे नियोजन करून घराची रेखी करून मयत चंद्रकलाबई श्रीपतराव पाटील यांचा खुन करून त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागीने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून घेवुन गेले असल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्हयात आरोपी नामे 1) विठठल व्यंकट बोईनवाड, रा. वसुर ता. मुखेड 2 बालाजी पंढरी सोनकांबळे, रा. मंग्याळ, ता. मुखेड 3) गौतम दशरथ शिंदे रा. वसुर ता. मुखेड 4 ) शेषेराव माधवराव बोईनवाड, रा. वसुर ता. मुखेड 5)शहाजी श्रीराम मोरतळे, रा. मोरतळवाडी ता. उदगीर यांना अटक करण्यात आली.
मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देगलुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोहन माछरे, हे करत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button