शहर

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर यादीतील सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र तयार ठेवा

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुल मंजुर झालेल्या व अद्याप कामास सुरुवात न केलेल्या लाभार्थ्यांना याव्दारे सुचित करण्यात येते की, नगरपरिषद संचालनालय, बेलापुर, नवि मुंबई यांच्या दि. 25/01/2023 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजुर डीपीआर मधील ज्या लाभार्थ्यांनी घरकुल चालु केलेले नाहीत अशा लाभार्थ्यांचा मेळावा घेऊन आवश्यक कागदपत्रे जमा करुन घरकुल बांधकामाचे आदेश देण्यात येणार आहेत.

तसेच नगर परिषद संचालनालय यांच्या परिपत्रकानुसार दि. 26/01/2023 ते दि.26/02/2023 दरम्यान वैयक्तीक घरकुल बांधणी विशेष अभियान राबविण्यात येणार असुन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर यादीतील सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र तयार ठेवुन आपल्या भागात येणा-या महानगरपालिकेच्या पथकाकडे जमा करण्यात यावे. मंजुर लाभार्थ्यांची यादी मनपा वेबसाईट www.nwcmc.gov.in वर व पथकासोबत असणार आहे, तसेच मनपा मुख्य कार्यालय, तळमजला, रुम क्र. 111 मध्ये उपलब्ध आहे, याची नोंद घ्यावी. मुदतीनंतर कागदपत्र जमा न करणा- या लाभार्थ्यांचे नांव मंजूर यादीतून वगळण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button