जिला

इदगाह मैदानाची सुधारणा नगरपंचायत प्रश्नाने याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे.

हिमायतनगर| नगरपंचायत अंतर्गत झालेल्या इदगाह मैदान सण २०१६-१७ मध्ये निधी मंजूर होऊन बांधकाम झाले होते. त्या जुन्याच कामाला सण २०१९ मध्ये दाखवून नव्याने बांधकाम केल्याच्या नावाने निधी उचला केल्याच्या आरोप मागील काही दिवसापासून होत असल्याने नगरपंचायतीचे तत्कालीन अधिकारी – पदाधिकारी यांच्यावर संशय निर्माण झाला आहे. याची चर्चा हिमायतनगर शहरासह संबंध जिल्हाभरात होत असताना आता नगरपंचायत प्रश्नाने याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे.

नगरपंचायत प्रशासनाने जारी केलेल्या प्रेसनोटनुसार महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) योजना सन 2016-17 अंतर्गत हिमायतनगर नगरपंचायत हद्दीतील इदगाह मैदानाचे बांधकाम करणेसाठी जिल्हाधिकारी नांदेड यांचे दि.17/10/2016 रोजीच्या आदेशान्वये रु.4338000/- ची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. त्या प्रशासकीय मान्यतेनुसार इदगाह मैदानाचे बांधकाम करणेसाठी ई-निविदा प्रणालीद्वारे कंत्राटदार एस.एस. पळशीकर यांना दि.23/12/2016 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. या कामाच्या अंदाजपत्रकात इदगाह मैदान ओट्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर सदरील कामाची तत्कालीन सल्लागार अभियंता यांनी मोजमाप पुस्तिकेत नोंद केल्यानुसार कंत्राटदारास देयक अदा करण्यात आले आहे.

त्यानंतर पुन्हा जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 नागरी दलीतेत्तर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीमधून इदगाह मैदानाचे सुशोभीकरण करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष कुणाल रामराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेऊन ठराव क्रमांक 01 दि.01/11/2018 (कामाचा अ.क्र.17) अन्वये निवड व निश्चिती केली. सर्वानुमते मंजूर ठरावाचे सूचक तत्कालीन नगरसेवक राम भिमराव ठाकरे व अनुमोदक तत्कालीन उपनगराध्यक्ष मोहम्मद जावीद हा.अ.गणी हे होते. इदगाह मैदानाचे सुशोभीकरण करनाचे अंदाजपत्रक तयार करून दि.03/01/2019 रोजी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेड यांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली. यात पुन्हा एकदा इदगाह मैदान ओट्याचे बांधकाम करणे यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांचे दि.14/01/2019 रोजीच्या आदेशान्वये रु. 4675177/- ची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रशासकीय मान्यतेनुसार इदगाह मैदान ओट्याचे बांधकाम करणेसाठी ई-निविदा मागविण्यात आल्या. यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष कुणाल रामराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेऊन ठराव क्रमांक 01 दि.25/02/2019 अन्वये इदगाह मैदान ओट्याचे बांधकाम करणेसाठी कंत्राटदार एस.एस. पळशीकर यांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

सर्वानुमते मंजूर ठरावाचे सूचक तत्कालीन नगरसेविका सौ.सुरेखा सदाशिव सातव व अनुमोदक तत्कालीन नगरसेवक अब्दुल गुफरान अब्दुल हमीद हे होते. त्यानंतर कंत्राटदारास दि.07/03/2019 रोजी इदगाह मैदान ओट्याचे बांधकाम आदेश देण्यात आले. सदरील संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कुणाल रामराव राठोड, उपनगराध्यक्ष मोहम्मद जावीद हा.अ.गणी व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे हे होते. त्यानंतर झालेल्या विशेष सभा ठराव क्रमांक 04 दि.31/08/2019 अन्वये इदगाह मैदान ओट्याचे बांधकाम कार्यारंभ आदेशाची मुदत समाप्त झाल्यामुळे व कामाचा स्कोप बदलल्यामुळे सदर निविदा रद्द करून नवीन अंदाजपत्रकानुसार फेरनिविदा देण्यात यावी. अशी मागणी कंत्राटदार एस.एस.पळशीकर यांनी केल्यानुसार सदर निविदा रद्द करून फेरनिविदा काढणेची कार्यवाही मुख्याधिकारी यांनी अनुसरावी असा सर्वानुमते ठराव विशेष सभेने मंजूर केला. मंजूर ठरावाचे सूचक तत्कालीन नगरसेविका सौ.अनुसयाबाई सावन डाके व अनुमोदक तत्कालीन नगरसेवक विनायक काशिनाथ मेंडके हे होते. 

इदगाह मैदानाची सुधारणा करणे या कामाचे नवीन अंदाजपत्रक तयार करून सदरील अंदाजपत्रकास दि.05/10/2020 रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोकर यांची तांत्रिक मान्यता घेण्यात आली. सदरील नवीन अंदाजपत्रक तयार करणे बाबतच्या प्रक्रियेदरम्यान नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कुणाल रामराव राठोड, उपनगराध्यक्ष मोहम्मद जावीद हा.अ.गणी व मुख्याधिकारी श्रीमती स्नेहलता स्वामी हे होते. तत्कालीन नगराध्यक्ष कुणाल रामराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभा दि.31/08/2019 रोजीच्या मान्यतेनुसार दि.25/01/2021 रोजी नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्ती झाल्यानंतर प्रशासकीय सभा ठराव क्र.16 दि.29/06/2021 अन्वये इदगाह मैदानाची सुधारणा करणे या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे करिता जिल्हाधिकारी कार्यालयास आवश्यक तो पाठपुरावा करावा असे ठरले. त्यानंतर नागरी दलीतेत्तर योजना सन 2018-19 अंतर्गत मंजूर निधीतून इदगाह मैदानाची सुधारणा करणे या कामासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांचे दि. 11/08/2021 रोजीच्या आदेशान्वये रु.4997600/- ची सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. प्राप्त झालेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार इदगाह मैदानाची सुधारणा ई-निविदा प्रणालीद्वारे निविदा मागवून सर्वात कमी दराचे निविदाधारक कंत्राटदार एस.एस. पळशीकर यांना दि.24/01/2022 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. 

करणे या कामाच्या अंदाजपत्रकात इदगाह मैदान ओट्याची उंची वाढवणे, ओट्याची उंची वाढविण्यासाठी ओट्याच्या चारही बाजूस पिल्लर व बीम उभारणी करून भिंत (पडदी) बांधकाम करणे, ओट्यावर चढण्यासाठी पायऱ्या बांधकाम करणे, इत्यादी सुधारणा विषयक कामे समाविष्ट असून, सदरील आवश्यक असलेली कामे करणे करिता शहरातील नागरिकांनी हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांना विनंती केली होती. त्यानुसार आमदार महोदयांनी तत्कालीन नगराध्यक्ष, पदाधिकारी व नागरिक यांच्या समक्ष प्रत्यक्षस्थळी भेट देवून उपरोक्त कामे नियमानुसार करणे बाबत दि.19/09/2020 रोजी दिलेल्या सुचनेनुसार सदरील कामे करण्यात आली आहेत. 

कंत्राटदार एस.एस.पळशीकर यांनी केलेल्या कामाची तत्कालीन नगर अभियंता यांनी मोजमाप पुस्तिकेत नोंद केल्यानुसार व कामाची नियमानुसार शासकीय तंत्रनिकेतन नांदेड मार्फत त्रयस्थ तांत्रिक तपासणी (Third Party Audit) व गुणवत्ता चाचणी तपासणी (Test Report) करण्यात आली. त्यांचा अहवाल समाधानकारक प्राप्त झाल्यानंतरच कंत्राटदार यांना प्रथम धावते देयक अदा करण्यात आलेले आहे. अंतिम देयक अद्याप अदा करण्यात आलेले नाही. इदगाह मैदान ओट्याचे बांधकाम करणे व इदगाह मैदानाची सुधारणा करणे ही दोन्ही कामे वेगवेगळ्या योजनेमधील आहेत. दोन्ही कामांचे ठिकाण एकच असून, दोन्ही कामाची अंदाजपत्रके व दोन्ही कामे वेगवेगळी आहेत. नियमानुसार शहरातील कुठल्याही कामासाठी शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर सदर निधीमधून घ्यावयाच्या कामाची नगरपंचायत सभेद्वारे निवड निश्चिती केल्यानंतरच संबंधित कामांची अनुषंगिक पुढील प्रक्रिया अवलंबण्यात येते.  

इदगाह मैदान बांधकामाबाबत मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मिरासाब रा.फुले नगर, हिमायतनगर यांनी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे दि.19/08/2022 रोजी दिलेल्या तक्रार अर्जानुसार विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी दि.21/09/2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे सूचित केले. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी नगर पंचायत कार्यालय हिमायतनगर यांना दिलेल्या सुचनेनुसार इदगाह मैदान बांधकामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना कागदपत्रांसह सविस्तर अहवाल दि.16/11/2022 रोजी सादर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दि.05/12/2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना कागदपत्रांसह सविस्तर अहवाल सादर केला. सदरील अहवालामध्ये मुख्याधिकारी यांनी अनुषंगिक सर्व अभिलेख सादर केले असल्यामुळे तसेच प्रथमदर्शनी तक्रारीत तथ्य दिसून येत नसल्यामुळे अहवाल व त्यासोबतची कागदपत्रे सादर केलेली आहेत. 

विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी उपरोक्त अहवालानुसार तक्रारदार श्री मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मिरासाब रा.फुले नगर, हिमायतनगर यांना दि.17/01/2023 रोजीच्या पत्रान्वये “ प्रथमदर्शनी तक्रारीत तथ्य दिसून येत नाही.” असे कळविले आहे. सदरील इदगाह मैदान बांधकामात शासनाची कुठल्याही प्रकारची दिशाभूल अथवा फसवणूक झालेली नाही अथवा शासन निधीचा कुठल्याही प्रकारे दुरुपयोग, गैरव्यवहार झालेला नाही असे नगरपंचायतीने आज जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये म्हंटले आहे. परंतु झालेल्या ईदगाह मैदानाच्या कामाच्या ठिकाणी दुसऱ्या टर्मच्या लोकप्रतिनिधींनी ठराव घेतला कसा..? असा प्रश्न शहरातील विकासप्रेमी जनतेला पडला असून, जर यांनी ठराव घेतला तर पुन्हा निवेदन देऊन आपल्याच काळात मंजूर झालेल्या ठरावानुसार ईदगाह मैदानाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून काय सध्या केलं असाही प्रश्न आता शहरातील जनतेला पडला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button