राष्ट्रीय सेवा योजना सात दिवशीय शिबिर संपन्न
नांदेड दि.२९. देगलूर नाका येथील कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय विशेष वार्षिक शिबिर मौजे मुजामपेठ-धनेगाव येथे संपन्न झाले मागील सात दिवसापासून शिबिरा अंतर्गत विविध उपक्रम मुजामपेठ येथे राबविण्यात आले. यामध्ये ग्रामस्वच्छता,आरोग्य विषयक जनजागृती,महिला व बालकल्याण विकासासाठी मार्गदर्शन,बालविवाह प्रतिबंधक उपाययोजना, डिजिटल करन्सी,ऑनलाइन बँकिंग,रस्ते सुरक्षा विषयक जनजागृती यासारखे उपक्रम घेण्यात आले.त्याचबरोबर तज्ञ मार्गदर्शकाच्या माध्यमातून गावकरी व विद्यार्थ्यांचे उद्बोधन करण्यात आले यामध्ये प्राचार्य गणेश जोशी, प्रा.राज गायकवाड,प्रा. डाॅ.शिवाजी भागानगरे,प्रा.डाॅ. संतोष राठोड,प्रा.डाॅ.शिवाजी कांबळे,प्रा.डाॅ.शंकर लेखने,प्रा.डाॅ. विजय तरोडे, प्रा.डॉ.बिंबिसार वाघमारे,डॉ. बालाजी राठोड,प्रा.डाॅ.सुरेश गजभारे,यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मुजावर सर यांनी केले तर समारोप कार्यक्रमास डॉ. मोहम्मद बदियोद्दिन,प्रा.मजहर सर,प्रा.अर्जुमंदबानो यास्मिन, प्रा.खान नदीम परवेज यांची उपस्थिती होती. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी व नेत्ररोग तपासणी देखील घेण्यात आली. ज्याचा लाभ गावकऱ्यांनी घेतला शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भुक्तरे,प्राचार्य डॉ.उस्मान गणी,प्रा.सय्यद सलमान,प्रा. मोहम्मद दानिश,प्रा.अक्षय हासेवाड,प्रा.मोहम्मदअतिफोद्दिन,आयेशा बेगम,मोहम्मदी बेगम,गौस खान पठाण, सरपंच मा.श्री.गंगाधर पाटील शिंदे (पिंटू पाटील),मा.जिल्हा परिषद सदस्य श्री.मनोहर पाटील शिंदे, ग्राम विकास अधिकारी व्ही.पी.सूर्यवंशी,मुख्याध्यापक बळीराम बुकटे,वट्टमवार सर, मुखीत अहमद अब्दुल रहमान सर,श्री.भालके,शिवाजी बुचडे,संग्राम निलपत्रेवार,राजू बोटलावार,शेख मुख्तार शेख फारूक,गंगाधर कवाळे यांनी विशेष सहकार्य केले.