शिक्षण

मदरसा मोहम्मदिया अरेबिया व लुबीना उर्दू शाळा मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

( नांदेड/प्रतिनिधी) मोहम्मद ख्वाजा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी,नांदेड संस्था संचलित धार्मिक व समकालीन शैक्षणिक संस्था असलेल्या, मदरसा मोहम्मदिया अरेबिया व लुबीना उर्दू स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्रिय भारत देशासाठी बलिदान दिले.यावेळी सर्व महापुरुषांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.शाळेमधील विद्यार्थ्यांनी इंग्रजी,मराठी,उर्दू या तिन्ही भाषेत भाषणे सादर करण्यात आली.त्यानंतर उर्दू मीडियाचे अध्यक्ष अल्ताफ सानी,एटीएम कमिटीचे अध्यक्ष अलहाज अली हसन यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.त्यानंतर दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहणानंतर याही वर्षी सकाळी 10 वाजल्यापासून मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
कोरोना काळात ही आमची संस्था कोरोनाचे नियम व सेनिटायझर मास्क चे मोफत वाटप करण्यात आले होते,आजच्या शिबिरात तज्ञ डाॕक्टरांनी तपासणीस आलेल्या रुग्णांची तपासणी करुन गरजुवंत रुग्णांना डोळ्यांसाठी लागणारे चष्मे अगदी नाममाञ शुल्क घेऊन वाटप करण्यात आले.तर डॉ.एहसान चौधरी,डॉ.अब्दुल रफी फारुकी,डॉ.सरफराज, डॉ.सिकंदर,डॉ.एजाज फारुकी, डॉ.राचीवाड,डॉ.इकबाल आझमी,डॉ.अफरोज फातिमा, डॉ.बुशरा नाझमीन आणि इतर एम.आर सहभागी झाले होते. या शिबिराच्या आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.शेवटी संस्थेचे सचिव काझी मुहम्मद रफिक यांनी शिबिरात आलेले डॉक्टर व शिबिरासाठी परिश्रम घेणारे स्वयंसेवकांचे,संस्थेचे कर्मचाऱ्यांचे आभार मानले .परिसरातील सर्वधर्मीय वयोवृध्द महिला व पुरुष,नागरिक मोठ्या संख्येंने लाभ घेतला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button