जिला
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या कुटूंबीयांचा “स्नेह मेळावा संपन्न”
26 जानेवारी व मकर संक्रातच्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, यांच्या संक्लपनेमधुन व मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु) नांदेड यांनी स्नेहनगर पोलीस वसाहात श्रीनगर नांदेड येथे महिलांचा मकर सक्रांत निमित्ताने वाण, तसेच एकल महीलांसाठी सुध्दा वाण व विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कुटूंबीयासाठी स्नेहनगर पोलीस वसाहात नांदेड येथे महिलांसाठी हाळदी कुंकू तसेच समाजामध्ये एकल महिलांना आशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये मान देण्यात येत नाही आवर्जुन पणे अशा महिलांना बोलावुन त्यांचा आदर सत्कार करण्यात आला. रांगोळी स्पर्धा, डान्सस्पर्धा, पाककला यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक स्पर्धे मधुन उत्कृट कला सादरीकरण करण्याऱ्या स्पर्धकांना बक्षिस देण्यात आले. सर्वाना अल्पउपहार व महिलांना वाण देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमांत महिला, भगीनीने मुलांने चांगला प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमात सर्व वरिष्ट अधिकारी व अंमलदार यांच्या कुटूंबीयानी सहभाग नोंदवला होता.
सदर कार्यक्रमाची सुरूवात सौ. स्नेहल कोकाटे मॅडम यांचे हस्ते व सौ. राऊत मॅडम, मोरे मॅडम, भोरे मॅडम यांचे उपस्थितीत करण्यात येवुन यांच्या हस्ते स्पर्धकांना व महिलांना बक्षीस देण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्व करण्यासाठी मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु) नांदेड, मसपोनि श्रीमती कलेटवाड, कमल शिंदे, मपोउपनि स्नेहा पिंपरखेडे, बाभळे, प्रियंका आघाव, महिला पोलीस अंमलदार संगीता श्रीमंगले, सुप्रिया टोम्पे, शामका पवार, सुजाता कांबळे, मनीषा तोटेवाड, सिमा जोघंळे, कांचन शिंदे, शेख शमा, रूकमीन कानगुले, सुजाता टाकळीकर, गीता कांबळे, तेलंग उर्फ काळे, सुजाता आळंदीकर, दिपीका देशमुख, शुभांगी जाधव, क्रांती बंदखडके, मायादेवी गायकवाड, गोदावरी कुंडगीर, लोपमुद्रा आणेराव, यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्राचे सुत्रसंचालन सपोउपनि श्री विट्ठल कत्ते, यांनी केले.