जिला
नांदेड पोलीस पेट्रोलींगच्या 20 मोटार सायकलचे जिल्हाधिकारि नितीन राऊत यांचे हस्ते उद्घाटन
महिला व नागरीकांच्या संरक्षणासाठी आपले दैनंदीन व्यवहार व शहरात निर्भयपणे संचार करणेसाठी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे संकल्पने मधुन पेट्रोलींग मोबाईल निर्मीती करण्यात आली. शहरात 20 मो सा द्वारे पेट्रोलींग करण्यात येणार आहे.
शहरात होणारी गर्दी व अचानक उदभवनारे अनुचित प्रकार त्याच्यावर आळा बसावा तसेच महीला, मुली, नागरीकांना सुरक्षितता वाटावी, त्यांना उदभवणार्या अडचणी मध्ये तात्काळ मदत होण्यासाठी सदर पेट्रोलींगचे अंमलदार तात्काळ मदतीला पोहण्यासाठी तसेच सतत शहरात गर्दी, बाजार, शिकवणीच्या भागात होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलींग करण्यासाठी तसेच चैनस्नॅचींग, मुली व महिलांची छडखानी, गुन्हेगारीवर नियंत्रण, नाईट गस्त कामी याचा उपयोग करण्यासाठी सदर मो सा पेट्रोलंगची निर्मीती करण्यात आली. सदर मोबाईलचे आज जनतेच्या सेवेत 26 जानेवारी रोजीचे औचीत्य साधुन मा. श्री. राऊत जिल्हाधिकारी यांच्या हास्ते, मान्यवरांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले. सदर पेट्रोलींग मोबाईलचे नियंत्रण हे पोलीस नियंत्रण कक्ष येथुन करण्यात येणार आहे.