एका तरुणाचा मृतदेह गावानजीक असलेल्या शेतातील वीज खांबाच्या तारांना लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या
हिमायतनगर – तालुक्यातील सरसम बु. येथील एका तरुणाचा मृतदेह गावानजीक असलेल्या शेतातील वीज खांबाच्या तारांना लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गावातील नागरिकात तरुणाचा मृत्यु हत्या की आत्महत्या असा संभ्रम निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असुन पोलीसांच तपास कार्य सुरू आहे.
दि. २७ शुक्रवारी सरसम नजीक बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्या पासुन काही अंतरावरील बिएसएनएल टॉवर नजीक विज खांबाच्या तारांना एका तरूणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळुन आला, धाडशी ग्रामस्थांनी जवळ जावुन शहानिशा केली तर विकास उर्फ सोनु नामदेव मंडलवाड वय ३० वर्ष हा असल्याचे लक्षात आले, या विषयीची माहिती नातेवाईकांना देण्यात आली.
मयत विकास उर्फ सोनु याचा भाऊ बालाजी नामदेव मंडलवाड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सहा. पोलिस निरीक्षक बालाजी महाजन समवेत इतर पोलिस घटनास्थळी रवाना झाले असुन मयत विकास चे प्रेत विज वितरण कंपनीचे लाईनमन बालाजी जाधव यांनी विज पुरवठा बंद करून प्रेत खाली उतरण्यास सहकार्य केले. त्यानंतर पोलिसांनी प्रेताचा इंक्वेस्ट पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी कामी वृत्त लिही पर्यंत हिमायतनगर ग्रामिण रूग्णालयात पाठवण्यात आले होते.
नातेवाईकांना विकास उर्फ सोनु मागिल दोन दिवसा पासुन घरी न आल्याने त्याच्या मृत्यु बाबत शंका असल्याचे सांगण्यात आले त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
पोलिसांच्या तपासा अंती मृत्युचे नेमके कारण समोर येणार असुन सध्यातरी ग्रामस्थांत हत्या की आत्महत्या गुढ कायम आहे.
मयत वुकास उर्फ सोनु तत्कालीन तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कै. नामदेव मंडलवाड यांचा लहाना मुलगा होता.
घटनास्थळी बघ्यांची सकाळ पासुनच गर्दी जमली होती. मंडलवाड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सहा. पोलिस निरीक्षक बालाजी महाजन समवेत इतर पोलिस घटनास्थळी रवाना झाले असुन मयत विकास चे प्रेत विज वितरण कंपनीचे लाईनमन बालाजी जाधव यांनी विज पुरवठा बंद करून प्रेत खाली उतरण्यास सहकार्य केले. त्यानंतर पोलिसांनी प्रेताचा इंक्वेस्ट पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी कामी हिमायतनगर ग्रामिण रूग्णालयात पाठवले.
नातेवाईकांना विकास उर्फ सोनु मागिल दोन दिवसा पासुन घरी न आल्याने त्याच्या मृत्यु बाबत शंका असल्याचे सांगण्यात आले त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
पोलिसांच्या तपासा अंती मृत्युचे नेमके कारण समोर येणार असुन सध्यातरी ग्रामस्थांत हत्या की आत्महत्या गुढ कायम आहे.
मयत वुकास उर्फ सोनु तत्कालीन तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कै. नामदेव मंडलवाड यांचा लहाना मुलगा होता.
घटनास्थळी बघ्यांची सकाळ पासुनच गर्दी जमली होती.