इल्म पूर्व प्राथमिक शाळेचा वार्षिक संमेलन व प्रजासत्ताक दिन साजरा
आज दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी इल्म पूर्व प्राथमिक शाळा देगलूर नाका, नांदेड तर्फे वार्षिक संमेलन व प्रजासत्ताक दिन खान फंकशन हॉल, देगलूर नाका, नांदेड येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मोहणून मा. मौलाना तय्यब साहब, मा. मौलाना फातीम साहब, मा. मौलाना हाफिझ जावीद साहब, मा. मोहम्मद अझहरुद्दीन व हाजी मुनीरूद्दीन साहब उपस्थित होते.
कार्यक्रमाचा सूत्र संचालन मुख्याध्यापिका झुबेदा खान यांनी केला व तसेच सर्व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार मा. फेरोज खान व मा. मोहम्मद निजामुद्दीन (संचालक) इल्म पूर्व प्राथमिक शाळा यांनी केला. कार्यक्रमात शाळेतील सर्व मुलांनी सहभाग घेतला. व्यासपीठावर वेगवेगळे उपक्रम तिलावते पाक सुरे फजर (मोहम्मद साद) व सुरे रहमान (शेख अब्दुल हादी), हम्द, नात, प्रजासत्ताक दिन स्पीच, खेळ व अकशन सॉन्गस विद्यार्थींनी करून दाखविले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. मौलाना फातीम साहब यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देण्यास कुराणचा हवाला देत सांगितले कि, कुराण मध्ये इतर गोष्टीला महत्वना देता शिक्षण घेण्यास आलेल्या आयात बाबत सांगितले.
कार्यक्रमास यशस्वी करण्यास शाळेतील सर्व शिक्षकीका झुबेदा खान, जावेरीया खान, उनेसा अफशिन, माविया अंजुम, सायमा तबस्सुम, नौशीन तबस्सुम व खाला यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचा आभार मा. फेरोज खान ( अध्यक्ष, अमन मायनॉरिटी वेलफेरे सोसायटी, तथा संचालक, इल्म पूर्व प्राथमिक शाळा, नांदेड) व मा. मोहम्मद निजामुद्दीन ( सचिव, अमन मायनॉरिटी वेलफेरे सोसायटी, तथा संचालक, इल्म पूर्व प्राथमिक शाळा, नांदेड) यांनी मांडला.