जिला

हाथ से हाथ जोडो अभियानाच्या माध्यमातून विकास जनतेपर्यंत पोहचवा – अशोकराव चव्हाण

नांदेड दि. २७ जिल्ह्यासह शहरातील अनेक विकासकामे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात आले तसेच सत्तातंरानंतर आपण मंजूर केलेल्या मनपाच्या १५० कोटींच्या कामांना शिंदे -फडणवीस यांच्या सरकारने दिलेली स्थगिती उठवली आता या कामांनाही प्रारंभ होणार आहे. केलेला हा विकास प्रभागातील सर्वच नागरिकांपर्यंत पोहचवा असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
शहरातील शिवाजी नगर भागात शुक्रवार दि. २७ जानेवारी रोजी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित हाथ से हाथ जोडो अभियानाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण याच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी खा. भास्करराव पा. खतगावकर , पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत,जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर ,रेखा पाटील , जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा मीनलताई खतगांवकर,कोषाध्यक्ष विजय येवणकर , माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, मसूदखान, अब्दुल गफार, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, सेवादलाचे शिवाजी धर्माधिकारी , हरिभाऊ शेळके ,माजी नगरसेवक संदीप सोनकांबळे, दुष्यन्त सोनाळे आदींची उपस्थिती होती.

 

यावेळी पुढे बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की,काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेस देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला मात्र आपल्या सर्वांच्या टिम वर्कतुन नांदेडचे नियोजन व प्रतिसाद देशात नंबर वन ठरले आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमांतून राहुल गांधीं यांनी शेतकरी , कामगार , सर्वसामान्य जनतेची प्रश्न जाणून घेत त्याचा आवाज सरकार पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला या यात्रेमुळे वातावरण निर्मिती झाली आहे. ती हाथ से हाथ जोडो अभियानाच्या माध्यमातून टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी करोडोचा निधी आणला , आताच्या सरकारने मनपाच्या १५० कोटींच्या कामांना दिलेली स्थगिती उठवली आपण मंजूर करून आणलेल्या कामाचे आता हे नारळ फोडून आम्हीच कामे करीत आहोत हे भासवण्याचा प्रयत्न विरोधक करतील गाफील राहू नका आपण केलेली व आता आपल्यामुळे होणाऱ्या विकास कामांची माहीती जनतेपर्यंत पोहचवा आता ७० टक्के वेळ कार्यकर्ते, नेत्यांनी हाथ से हाथ जोडो अभियानाच्या यशस्वीतेसाठी द्या असे आवाहन त्यांनी केले.

 

याप्रसंगी माजी खा. भास्करराव पा. खतगावकर म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रे नंतरची यशस्वी यात्रा म्हणजे भारत जोडो यात्रा आहे. वातावरण निर्मिती झाल्याचा फायदा कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होईल मात्र देरे हरी पलंगावरी असे होणार नाही आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर जनतेचा विश्वास पाहता आगामी सर्व निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत यांनीही विचार मांडले तर प्रास्ताविकात माजी आमदार अमरनाथ राजूरकर आपण केलेल्या विकास कामांचे मार्केटींग करा व येणाऱ्या दिवसांत जनसंपर्क वाढवा असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन संतोष देवराये यांनी केले यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button