नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात वार्षिक विद्यार्थी महोत्सवाचे आयोजन
नांदेड दि.२१ येथील अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयात दिनांक 20 जानेवारी 2023 पासून ते दिनांक 25 जानेवारी 2023 यादरम्यानच्या काळात विद्यार्थी वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी महाविद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन रॅलीचे उद्घाटक म्हणून मा. रविंद्र जोशी, जिल्हा न्यायाधीश, नांदेड व प्रमुख उपस्थितीमध्ये अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय बालासाहेब पांडे, सचिवा, माननीय अँड.सौ. वनिता जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अभिवादन रॅली नंतर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती, विद्यार्थी वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून मा.डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठित अशा 75 जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. वार्षिक महोत्सव 2023 चे समापन दि. 25 जानेवारी रोजी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने होणार आहे. या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिनव भारत शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष, माननीय कैलाशचंद जी काला हे असणार आहेत. या कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.शफकत आमना, सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर उपविभाग नांदेड यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाकरिता सर्व विद्यार्थ्यांनी व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर, वार्षिक विद्यार्थी महोत्सव समितीच्या प्रभारी प्रा. डॉ. सौ. शालीनी वाकोडकर, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अजय संगेवार आणि प्रा. डॉ. दत्ता बडुरे, विद्यार्थी वार्षिक महोत्सव उपप्रमुख यांनी केले आहे.