औरंगाबादेतही ‘जामतारा’, कॉलसेंटरमध्ये जे सुरू होतं ते पाहून पोलीसही चक्रावले; 1 हजार मोबाईल जप्त
ऑनलाइन फसवणुकीसाठी देशभर बदनाम असलेल्या झारखंड राज्यातील “जामतारा येथील मॉडेलनुसार हे काम सुरू होते. यासाठी आरोपींनी औरंगाबादमध्ये एक कॉलसेंटर सुरू केले होते. या कॉलसेंटवर डेहराडून पोलिसांनी छापा टाकत हे कॉलसेंटर उद्ध्वस्त केले आहे. घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणात साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
1 हजारांपेक्षा अधिक मोबाईल जप्तऔरंगाबाद शहरातील पैठण गेट परिसरात हे कॉलसेंटर सुरू होतं. पोलिसांनी या कॉलसेंटवर छापा टाकत घटनास्थळावरून 1 हजारांपेक्षा अधिक मोबाईल जप्त केले आहेत, सोबत दोन तलवारी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. या कॉलसेंटरचं काम तीन शिफ्टमध्ये सुरू होतं. या कॉलसेंटरमध्ये 200 पेक्षा अधिक तरुण काम करत असल्याचं समोर आलं आहे. जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा हे तरुण कर्जदारांना शिवीगाळ करताना आढळून आले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.