क्राईम

शिक्षकाने वर्गात चिडवल्यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या, संतापलेल्या आईने पोलिस स्टेशनमध्ये.

लातूर “कॉपीड गर्ल” म्हणून वर्गात शिक्षकाने चिडवल्याने नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली असल्याचा प्रकार नुकताच उजेडात आला आहे.

ही घटना लातूर शहरात  घडल्यापासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचबरोबर मुलीच्या आईने या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

श्रावणी नाईकनवरे ही विद्यार्थीनी नववीच्या वर्गात शिकत होती. तिच्या शाळेचं नाव किड्स इन्फोपार्क असं आहे. त्या शाळेतील शिक्षक राहुल पवार यांनी कॉपीड गर्ल असं म्हणून वर्गात चिडवल्याने श्रावणीची मानसिकता खचली होती. त्याच मानसिकतेतून श्रावणीने तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. या प्रकरणाची शिवाजीनगर पोलीस कसून चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मागच्या चार दिवसात लातूर जिल्ह्यात दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. मागच्या तीन दिवसापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या साक्षी गायकवाड या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली होती. तिची प्रथम सत्राची परीक्षा दोन दिवसावर होती .तिच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button