Uncategorized

अरे देवा! बायको नांदायला येईना! नांदेडमध्ये नवऱ्याने बघा काय केलं?

नांदेड, पतीसोबत वाद झाला अन् पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली. त्यानंतर जे घडलं ते विचित्रच होतं.
बायको नांदायला येत नाही म्हणून देविदास सिबिया हा व्यक्ती थेट पाण्याच्या टाकीवर चढला.
बायको नांदायला येत नाही म्हणून देविदास सिबिया हा व्यक्ती थेट पाण्याच्या टाकीवर चढला.
शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता पाण्याच्या टाकीवर चढून त्याने शोले स्टाईल आंदोलन केलं.
देविदास पत्नी, दोन मुलांसह हैद्राबादमध्ये कामामुळे राहायचा. काही दिवसांपूर्वी तो नांदेडला परतला.
कौटुंबिक वाद झाल्यानं पत्नी मुलांसह हैद्राबादमध्येच राहायला लागली.
पत्नी नांदेडला येत नसल्याने देविदास हताश झाला होता. त्यानंतर तो पाण्याच्या टाकीवर चढला.
माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले.
त्याला खाली येण्याची विनंती केली. बायको घरी येईपर्यंत खाली येणार नाही, असं तो म्हणाला.
तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना त्याला खाली उतरवण्यास यश आलं.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button