क्राईम

हिमायतनगर शहरातील जुगार अड्ड्यावर स्थागुशाची धाड; 5 जनावर गुन्हा दाखल

 

हिमायतनगर। येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जराड यांची नुकतीच जालना येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी नांदेड येथुन अमोल भगत यांची हिमायतनगर ला नियुक्ती करण्यात आली असून, ते पोलीस निरीक्षक पदावर रुजु झाले आहेत. पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच अवैध धंदे करणाऱ्याचा आढावा घेऊन कार्यवाहिचा बडगा उगारत स्थागुशाच्या मदतीने एका जुगार अड्डय़ावर छापा टाकून 7 जुगार्याना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हिमायतनगर शहर व परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

नांदेडला येण्यापूर्वी पोलिस निरीक्षक अमोल भगत हे मुंबई येथे कार्यरत होते. मुबईचा त्यांना गुन्हेगारी क्षेत्राचा दांडगा अनुभव असल्याने ते आपल्या कार्यकाळात हिमायतनगर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या अवैध कारभारावर जरब बसविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच हिमायतनगर शहरातील बोरगडी रस्त्यावर चालत असलेल्या एका जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पोलीसांनी छापा टाकून 7 जुगार्याना, मोबाईल, जुगाराचे साहित्य, नगदी रकम 13 हजार 700 रुपय असा एकूण 59 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. हि कारवाई दि.९ मंगळवारी दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान बोरगडी रस्त्यावरील दक्षिण मुखी टिन पत्र्याच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळताना करण्यात आली आहे. हिमायतनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्यादी पोलीस जमादार हनुमंत राव रघुनाथ पोतदार यांच्या फिर्यादीवरून 5 जणांवर कलम 12 मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हिमायतनगर शहरात अवैध धंद्यानी थैमान घातले असून, मागील काही महिण्यापासून जुगार अड्डे, देशी विदेश दारूची विनापरवाना विक्री, मटका, गुटखा, यासह अन्य अवैध धंदे तर बिनदिक्कत पणे चालूच आहेत. तसेच शहरात गँगवॉर सारखे प्रकरणे घडू लागली आहेत. परवाच अश्या प्रकारची घटना घडली असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतू शहरातील सुज्ञ नागरिकांनी तसे होवू न देता घडलेले प्रकरण सामंजस्याने हाताळले. परंतू घटना घडल्यानंतर जनतेचा पोलीसावर रोष होताच, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घडलेल्या घटनेची गंभीर नोंद घेवून प्रकरण हाताळले याच दरम्यान पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांची जालना येथे बदली झाली आहे.

 

अवैध धंदे बंद करण्यात यश मिळेल का..?
हिमायतनगर पोलिस स्टेशन अंतर्गत बोटावर मोजता येतील एवढेच गावे वगळता गावोगावी, वाडी, तांड्यावर अवैध देशी दारू व बनावट शिंदी विकणाऱ्या लोकांनी कहर केला आहे. मागील काळात गावातील दारु बंद करावी म्हणून काही गावच्या महिलांनी थेट पोलिस स्टेशन गाठले होते. दुर्दैवाने मागील काळात अनधिकृत दारु बंद करण्यास प्रशासनाला म्हणावे तेव्हडे यश आले नाही. त्यामुळे नव्याने रुजु झालेले पोलिस निरीक्षक अमोल भगत यांना तालुक्यातील अनाधिकृत देशी दारू, बनावट शिंदी, यासह शहर व ग्रामीण भागातील चालविले जाणारे मटका, गुटखा, जुगार अड्डे आणि धूम स्टाईल वाहने यावर अंकुश लावण्यास पोलिसांना यश येईल का..? याकडे सुजान पालक व महिलां मंडळीचे लक्ष लागून आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button