पंढरपूर येथील ‘आषाढ एकादशी’ साठी नांदेड विभागातून पंढरपूरसाठी विशेष गाड्या धावणार
नांदेड रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे आषाढ एकादशीच्या निमित्ताने नांदेड विभागातून पंढरपूरसाठी विशेष गाड्या चालवणार आहे.
महाराष्ट्रात ‘आषाढ एकादशी’ हा एक महत्त्वाचा सण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यंदा आषाढ एकादशी 17 जुलै रोजी येत आहे. मंदिराजवळील मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी यात्रेकरू प्रवासी मोठ्या संख्येने पवित्र नगरी पंढरपूरकडे जाणार आहेत. त्यानुसार, या यात्रेकरू प्रवाशांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागातील तीन महत्त्वाच्या स्थानकांवरून म्हणजे नगरसोल, अकोला आणि आदिलाबाद येथून विशेष गाड्या चालवणार आहे, या तिन रेल्वे नांदेड विभागातील सर्व स्थानकांवरील प्रवाशांना पंढरपूर ला जाण्याचा उत्तम पर्याय देतील.
विशेष रेल्वे सेवांचे तपशील खाली दिले आहेत –
अनु क्र. गाडी क्र. पासून-पर्यंत प्रस्थान आगमन
दिनांक (दिवस) वेळ दिनांक वेळ
1 07515 नगरसोल-पंढरपूर 16.07.2024 (मंगळ) 19.00 17.07.2024 (बुध) 11.30
2 07516 पंढरपूर-नगरसोल 17.07.2024 (बुध) 23.55 18.07.2024 (गुरु) 20.00
3 07505 अकोला-पंढरपूर 16.07.2024 (मंगळ) 11.00 17.07.2024 (बुध) 10.50
4 07506 पंढरपूर-अकोला 17.07.2024 (बुध) 21.40 18.07.2024 (गुरु) 20.00
5 07501 आदिलाबाद-पंढरपूर 16.07.2024 (मंगळ) 09.00 17.07.2024 (बुध) 03.00
6 07504 पंढरपूर-आदिलाबाद 17.07.2024 (बुध) 20.00 18.07.2024 (गुरु) 15.00
1. गाडी क्रमांक 07515/07516 नगरसोल -पंढरपूर- नगरसोल विशेष गाडी:-
या विशेष गाड्या रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्सी टाऊन आणि कुर्डूवाडी स्थानकांवर दोन्ही दिशेला थांबतील.
या विशेष गाड्यांमध्ये 04 स्लीपर क्लास आणि 14 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.
02. गाडी क्रमांक 07505/07506 अकोला-पंढरपूर-अकोला विशेष गाडी:- ही विशेष गाडी दोन्ही दिशेला वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तपुर, वाडी, कलबुरगी, सोलापूर, कुरडूवाडी रेल्वे स्थानकावर थांबेल.
या विशेष गाड्यांमध्ये 01 वातानुकूलित, 04, स्लीपर क्लास आणि 17 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत
03. गाडी क्रमांक 07501/07502 आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद विशेष ट्रेन:-
या विशेष गाड्या किनवट, बोधडी, धानोरा, सहस्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा जंक्शन, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टाऊन, कुरडुवडी जंक्शन येथे दोन्ही दिशांना थांबेल.
या विशेष गाड्यांमध्ये 02 स्लीपर क्लास आणि 14 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत