मनोरंजन

आठवड्याभरानंतरही रितेश जिनिलियाच्या ‘वेड’ ची बॉक्स ऑफिस हवा, ‘सैराट’चाही ब्रेक केला रेकॉर्ड

भिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

या चित्रपटामार्फत रितेशने दिगदर्शनामध्ये पाऊल टाकले आहे तर जिनिलियाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. या सेलिब्रिटी कपलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा आता दुसरा आठवडा सुरु आहे तरी देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणत मिळत आहे. आता तर या चित्रपटाने नागराज मंजुळेंच्या बहुचर्चित ‘सैराट’ या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत नागराज मंजुळेंचा ‘सैराट’ हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर होता. या सिनेमाने १२. १० कोटींची कमाई केली होती. आता ‘वेड’ या सिनेमाने हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ‘वेड’ या सिनेमाने आतापर्यंत ३३.४२ कोटींची कमाई केली आहे. वेड हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ‘वेड’ या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. दुसऱ्या रविवारी या सिनेमाने ५.७० कोटींचा गल्ला जमवला आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईचा आलेख हा वाढत चालला आहे. रिलीजच्या दहा दिवसांनंतरही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

पहिला दिवस – २.२५ कोटी
दुसरा दिवस – ३.२५ कोटी
तिसरा दिवस – ४.५० कोटी
चौथा दिवस – ३.०२ कोटी
पाचवा दिवस – २.६५ कोटी
सहावा दिवस – २.५५ कोटी
सातवा दिवस – २.४५ कोटी
आठवा दिवस – २.५२ कोटी
नऊवा दिवस – ४.५३ कोटी
दहावा दिवस – ५.७० कोटी

रितेश देशमुखने वेड या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या चित्रपटातून जेनेलिया देशमुख मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. तसेच बऱ्याच वर्षानंतर ती रितेशसोबत रुपेरी पडद्यावर काम करताना दिसली आहे. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अशोक सराफ रितेशने साकारलेल्या पात्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. रितेश-जेनेलियासोबत विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर हे कलाकार चित्रपटात दिसले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button