श्रीनिकेतन शाळेत शाळा प्रवेश उत्सव उत्साहात
नांदेड/प्रतिनिधी..दीपकनगर तरोडा बुद्रुक भागातील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत दीर्घ सुटल्यानंतर शनिवारी विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश उत्सव मुख्याध्यापिका डॉ. सौ. एस.एन. राऊत यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापिका डॉ.एस. एन.राऊत यांच्या संकल्पनेतून आयोजित विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश उत्सवात शाळेचे प्रवेशद्वारावर सुंदर असे डेकोरेशन करण्यात आले होते. विद्यार्थी शाळेच्या प्रवेश द्वारावर येताच सर्वप्रथम मुख्याध्यापिका डॉ .राऊत यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करून भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी पालकांनी मोठी गर्दी केली होती.
विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ नंतर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकासह सर्व शिक्षकांनी आपला परिचय करून दिला सोबतच विद्यार्थीही यावेळी आपल्या वर्ग पदोन्नतीसह आपला परिचय दिला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध मोफत पाठ्यपुस्तके मुख्याध्यापिका डॉ.सौ. राऊत यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थी आनंदी व उत्साही दिसून आले. यावेळी शालेय पोषण आहारासह विद्यार्थ्यांना केळीही वाटप करण्यात आली .विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेश उत्साहात शाळेतील शिक्षक अविनाश इंगोले, बाळकृष्ण राठोड, सुदर्शन कल्याणकर, श्रीधर पवार, सौ. सुरेखा मरशिने, बालवाडी शिक्षिका सौ. बुद्धागना गोखले, शिक्षक गतिश मगरे, प्रल्हाद आयनेले आदीने सहभाग नोंदविला.