जिला
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात
नांदेड, दि. 15 : दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात इच्छुक आहे. मतदारसंघात भेटीगाठी, लग्न सोहळे, विविध कार्यक्रमांतून चर्चा घडुन येत आहेत. यात महायुतीकडुन माजी जि.प. सदस्य मनोहर शिंदे पाटील, राजु काळे पाटील, भाजपा युवामोर्चाचे माजी महानगरध्यक्ष संजय घोगरे पाटील तर महाविकास आघाडीतून आ. मोहनराव हंबर्डे, विनय गिरडे पाटील, श्रीनिवास मोरे, बालाजी पुणेगावकर, वच्छलाताई पुयड, भुजंग पाटील यांच्याकडून नांदेड दक्षिण मतदारसंघात ज मोर्चेबांधनी करण्यात येत असल्याने चर्चाला उधान आले आहे.
नांदेड जिल्हयात लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात मोठा बदल घडला असला तरी लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवारीने विजय आपल्या पारड्यात घेतल्याने अनेकांचे इच्छा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. त्यातच जंरागे पाटील यांच्या लाटेत आपल्या संधी मिळू शकते, या आशेवर गेल्या विधानसभेत काही कारणामुळे ज्याची इच्छा असूनसुद्धा ते विधानसभा लढवू शकले नाहीत, असे इच्छुक उमेदवार यावेळी विधानसभेची तयारी करताना दिसत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे आहेत. तर महायुतीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे आहेत. तर तिसऱ्या बाजुला एमआयएम, मनसे, जंरागे पाटील यांचे उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते.
3 लोकसभेच्या विजयानंतर काँग्रेस पक्षाने घेतलेली मताची आघाडी या जोरावर काँग्रेस पक्षाकडून पुन्हा आ. मोहनअण्णा हंबर्डे यांची दक्षिणमधून उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीत मनपाचे नाराज माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांची भेट घेवून त्यांना लोकसभेच्या प्रचारात आणले होते. त्यामुळे यावेळी विनय गिरडे पाटील यांना तुम्ही काम करा तुम्हाला संधी मिळेल, असे आश्वासन दिल्याची चर्चा होती. परंतु विनय पाटील गिरडे यांना मात्र शिवसेना, जरांगे पाटील याच्यासह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यानी भेटी घेतल्याचे समजत असले तरी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्याने ते पुन्हा काँग्रेसकडून इच्छुक असल्याचे समजते.
महायुतीच्यावतीने अनेकजन इच्छुक असले तरी येथील स्थानिक नागरिकांनी मात्र आयात उमेदवार करुन नये अशी भूमिका घेत मतदार संघातील उमेदवाराला प्राधान्य देण्याची मागणी करत आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे प्रबळ दावेदार असलेले वाजेगाव जि.प. सदस्य मनोहर शिंदे पाटील यांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विधानसभेच्या तयारीला लागा असे आश्वासन माजी आ. अमरनाथ राजुरकर यांच्या उपस्थित दिल्याने ते नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आशिर्वाद घेत जनसंपर्क करत आहेत आणि ते महायुतीकडुन इच्छुक आहेत. त्यांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांच्यासोबत भाजपात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना भाजपा नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष होणारे ते एकमेव विश्वासू होत. त्यांचे व्याही माजी नगरसेवक राजू काळे पाटील हेसुध्दा इच्छुक असले तरी आमच्या दोघांपैकी एकाला संधी मिळेल, अशी शक्यता दोघांनी वर्तली आहे. ग्रामीण व शहरी भागात या दोघांची चांगली पकड आहे.
गत विधानसभा निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवत त्यांनी विस इच्छुकांच्या सह्याचे पत्र अशोकराव चव्हाण देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता. – महायुतीच्यावतीने माजी खा. प्रताप पाटील – चिखलीकर यांचे विश्वासू तथा मनपातील – नगरसेविका घोगरे यांचे प्रतिनिधी तथा माजी, युवामोर्चाचे महानगरध्यक्ष संजय घोगरे यांनी ■ युवाशक्तीच्या माध्यमातून विधानसभेची तयारी सुरु केली आहे. त्यांनी दि. १६ रोजी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची संवाद सभा व. ठेवली आहे. हे उमेदवार प्रबळ दावेदार मानले जात असले तरी महाविकास आघाडी, महायुत्तीच्यावतीने भुजग पाटील, बालाजी पाटील पुणेगावकर, वच्छलाताई पुयड, श्रीनिवास मोरे यांची नावे विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
यासर्वानी नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात भेटी गाठीला सुरुवात केली आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा अर्धा मनपात असून ३५ नगरसेवक या मतदार संघात येतात. त्यामुळे हा मतदारसंघ शहरी व ग्रामीण असा आहे. या भागात मुस्लीम, बौध्द, मराठी असा बहुभाग असला तरी ओबीसी व इतर समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
यामुळेच गेल्या विधानसभा निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांनी मोहनराव हंबर्डे यांना निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने उमेदवारी दिली होती. ते नेहमीच आपल्या बाजुने राहतील असे वाटत असताना मोहनराव हंबर्डे सुरवातीला अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपसोबत जातील असे वाटत होते. परंतु त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या विरोधात उभे राहत काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप अशी युती होती. काँग्रेस राष्ट्रवादी अशी एकत्र आघाडी होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम असे चित्र होते.
यावेळी सर्वच चित्र बदलल्याने होणारी निवडणूक दोघांनाही तेवढी सोपी राहणार नाही. त्यातच जरांगे पाटील व मनसे राजकीय पक्ष या निवडणुकीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या इच्छूकाला या विधानसभेत यश मिळेल हे पाहावे लागेल