जिला

स्नेहमेळाव्यात रमले माजी विद्यार्थी..

 

नांदेड :-जिल्हा प्रतिनिधी (अमर गोधने): शालेय जीवनातून गेल्यानंतर संसाराच्या रोजच्या रहाट गाडण्यातून पुन्हा एकत्र येण्याची संधीचे आयोजन सन 2002 -2003 मधील इ 10 वी तील हडको नविन नांदेड येथील इंदिरा गांधी हायस्कूल मधील माजी विद्यार्थीनी केले
रविवारी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात इ 10वी तील मित्र -मैत्रीनी विद्यार्थीदशेत पोहचले आणि लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. महाविद्यालयाची तर गोष्टच काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास 22 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.

22 वर्षांच्या काल खंडानंतर 2002 -2003 मधील इ 10 वीच्या माजी विद्यार्थ्यांचा शिक्षक व शाळे विषयीचा कृतज्ञ स्नेह-समेलन माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी या वेळी एकत्र आले. धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला आहे;अनेक वर्षानंतर भेटलेल्या मित्राला कुणी आपुलकीने विचारपूस करीत होते. शिक्षकांबद्दलच्या कृतने पोटी नकळत होते. त्यांच्या पायाकडे जात होते, विद्यार्थ्यांकडून उतराई म्हणून सन 2002 ला शिकवणाऱ्या सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू म्हणून एक छोटेसे रोपटे देण्यात आले व माजी विध्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.शालेय जीवनातील काही खेळ माजी विद्यार्थी नी खेळून शालेय आठवणीना उजाळा दिला व अल्प-उपहाराने स्नेहमेळाव्या कार्यक्रमाची सांगता झाली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button