नांदेड जिल्हा पोलीस भरती-२०२२-२३, साठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना सुचना.
१) पोलीस भरतीची मैदानी चाचणी दि.१९.०६.२०२४ ते ०३.०७.२०२४ पर्यंत पोलीस मुख्यालय, नांदेड येथे सकाळी ०५०० वाजता पासून राबविण्यात येणार आहे.
२) जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल.
३) काही उमेदवारांना वेगवेगळया पदांकरीता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल.
४) काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल. ५) उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्रावर दिलेल्या १ ते १२ सुचनांचेकाटेकोरपणे पालन करावे.
६) पोलीस भरतीसाठी उपस्थित उमेदवारांची लघवी व रक्त तपासणी वैदयकीय तज्ञ यांचेकडुन करण्यात येणार असल्याने उत्तेजक व मादक पदार्थाचे सेंवन टाळावे, तसे आढळल्यास उमेदवार पुढील प्रकियेसाठी अपात्र ठरविला जाईल.
७) पोलीस भरती करिता कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये किंवा कोणत्याही अमिषाला बळी पडू नये.
८) लाच देणे किंवा लाच घेणेहे दोन्हीही कायदयाने गुन्हा असुन असे आढळुन आल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांना टोल फ्री क्रं. १०६४ या क्रंमाकावर संर्पक करावा.
९) पोलीस भरती संबंधाने कोणत्याही भुलथापांना व अफवांना बळी पडु नये अथवा अफवावर विश्वास ठेवू नये. १०) पोलीस भरती संबंधाने कोणतीही अफवा आढळुन आल्यास पोलीस नियत्रंण कक्ष, नांदेड येथे संर्पक करावा.
११) पोलीस भरती ही निःपक्षपाती पणे व पारदर्शक पणाने होत असुन दलाला पासुन सावध रहा.