देश विदेश

बाल्कनीत अडकलेली मुलगी बचावासाठी ओरडत राहिली; शेवटी जिवंत जळाली, धक्कादायक

हमदाबाद 07 जानेवारी : अहमदाबादच्या शाहीबाग भागातील 11 मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शनिवारी आग लागली. या अपघातात एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
ती 25 मिनिटं बाल्कनीत अडकली होती आणि आपला जीव वाचवण्यासाठी लोकांकडे विनवणी करत होती, पण तिला वाचवता आलं नाही. या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत. कुटुंबातील चार जणांचा जीव वाचला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद फायर ब्रिगेडला सकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी कॉल आला. शाहीबाग येथील गिरधर नगर सर्कलजवळ असलेल्या ऑर्किड ग्रीन फ्लॅटच्या सातव्या मजल्यावर ही आग लागल्याचं सांगण्यात आलं. माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचं काम सुरू केलं.

5 वर्षीय प्रांजल बाल्कनीत अडकली होती.
तर इतर लोक फ्लॅटमध्ये होते.आग लागली तेव्हा फ्लॅटमध्ये पाच जण होते. चौघे बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर प्रांजल खोलीत अडकली. नंतर ती बाल्कनीकडे गेली आणि तिचा जीव वाचवण्याची विनंती करू लागली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आठच्या सुमारास बचावकार्य सुरू झाले. अग्निशमन दलाचे एक पथक 8 व्या मजल्यावर पोहोचले. तिथून दोरी बांधून दोन जण त्या बाल्कनीत पोहोचले. त्यांनी मुलीला बाहेर काढलं. यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती 100% भाजली होती. यामुळे तिचा मृत्यू झाला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button