ब्लड कॅन्सर वेळेत उपचार केल्याने बरा होतो -डॉ.गणेश जयशेटवार
नांदेड – अनेकांना रक्तातील ब्लड कॅन्सर होतो परंतू त्यावर वेळेत उपचार न झाल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. रक्तातील कर्करोग हा बरा होणारा आहे रूग्णांनी वेळेत उपचार घेतले तर तो बरा होतो. महिन्याच्या पहिल्या शनिवारी नांदेड येथील नारायण हॉस्पीटल येथे रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध आहे. अशी माहिती यशदा हॉस्पीटल सोमाचीगुडा हैद्राबाद येथील रक्तातील कर्करोग तज्ञ डॉ.गणेश जोसटवार यांनी दिली.
रक्तातील कॅन्सर बद्दल माहिती देतांना डॉ.गणेश जयशेटवार म्हणाले की, रक्तातील कॅन्सर अनेक प्रकारचे असतात. आता नविन तंत्रज्ञानामुळे हा आजार बरा केला जाऊ शकतो.
80 ते 90 टक्के रूग्ण उपचारानंतर बरे होतात. आतापर्यंत सोमजीगुडा येथील यशोदा हॉस्पीटलमध्ये 250 हून अधिक रूग्णांवर बोनमॅरो ट्रान्स्फर केले आहे त्याचा फायदा या रूग्णांना होवून रक्तातील कॅन्सर बरा झाला आहे. रक्तदोषातील विविध विकार दूर करण्याची पध्दती अवगत आहे त्यामुळे आता रूग्णांना घाबरण्याची गरज नाही असे त्यांनी सांगून वेळीच उपचार घेण्याचे आवाहन केले. यावेळी ब्लड कॅन्सरमधून मुक्त झालेले रूग्ण डॉ.सुनिल वाघमारे, सुशिल गोथी यांनी उपचार पध्दतीबद्दल सांगून आपण योग्य उपचाराने पुर्ण बरे झाल्याचे सांगितले. नारायण हॉस्पीटलचे डॉकटर यांनी तिसर्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील नारायणी हॉस्पीटल येथे सर्वच प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याने सांगिगतले. यावेळी डॉ.विजय मिसाले, डॉ.पंकज राठी आदिंची उपस्थिती होती.