देश विदेश

मुंबई-आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशा पर्यन्त विस्तारीत

 

मध्य रेल्वे ने मुंबई-आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशा पर्यन्त विस्तारीत करणार असल्याचे 15 मार्च, 2024 रोजी कळविले होते. त्यानुसार दिनांक 16 मार्च रोजी गाडी क्रमांक 01002 बल्लारशा ते मुंबई सी.एस.एम.टी. हि उद्घाटन विशेष गाडी बल्लारशा येथून दिनांक 16 मार्च रोजी धावली.

आज मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार, गाडी क्रमांक 11401 / 11402 मुंबई-आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस चा विस्तार बल्लारशा पर्यंत करण्यात आला आहे.

दिनांक 05 मे, 2024 रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11401 मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशा पर्यन्त धावेल.

तसेच दिनांक 07 मे, 2024 रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11402 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशा येथून सुटेल.

या गाडीचा विस्तार झाल्यामुळे ही गाडी पिंपळकुटी, वणी, भांडक आणि चंद्रपूर या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button