नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग 164 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत
नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी जगदीश भंडरवार प्रभारी पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन यांना आदेशीत केले होते. त्यानुसार त्यांनी सायबर पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.
नांदेड जिल्हयातील पोलीस स्टेशनचे अंमलदार व स्था.गु.शाचे पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा वेगवेगळया ठिकाणी जावून शोध घेवुन एकूण 164 मोबाईल किंमत 28,25,300/- रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्याचे आज एकत्रितरीत्या मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड. यांच्या हस्ते 70 मोबाईलचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत हस्तगत झालेले मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे Facebook Page (Nanded Police) व Twitter (@Nanded Police) वर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे अवाहन मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक यांनी केले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक श्री. अबिनाश कुमार नांदेड, डॉ.श्री खंडेराय धरणे. अपर पोलीस अधिक्षक भोकर, श्रीमती. डॉ. अश्विनी जगताप पोलीस उपअधिक्षक (गृह) पो.नि. जगदिश भंडरवार आगुशा. पो. नि. श्री उदय खंडेराय स्थागुशा. यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोउपनि गंगाप्रसाद दळवी व पोलीस अमंलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, रेषमा पठाण, दाविद पिडगे, काशिनाथ कारखेडे, मोहमद आसिफ, दिपक शेवाळे, विलास कदम, राजीव बोधगिरे, अकबर पठाण, व्यंकटेश सांगळे यांनी पार पाडली.
सदर कामगीरी बाबत मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदाराचे अभिनंदन केले आहे.