उप विभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) गुन्हे शोध पथकाची लागोपाठ तिसरी उल्लेखनिय कामगिरी
मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा.श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड आदेशाने आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने रेकॉर्ड वरील पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता आदेशीत केल्याप्रमाणे श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकॉ/ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे पोकों/भाऊसाहेब राठोड, अंकुश पवार, शेख इम्रान, बालाजी कदम यांनी संयुक्तरीत्या काल दिनांक 27/03/2024 रोजी 15.55 वाजताच्या सुमारास गल्ली क्रमांक 05, बिलाल नगर नांदेड क्वॉलिटी हॉटेल जवळ
मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकुन आरोपी नामे शेख शाहीद रा. बिलाल नगर, नांदेड यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातील विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले 01 गावठी पिस्टल जप्त केले आहे. यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक 249/2024 कलम 3/25 शत्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सपोनि श्री सचिन गढवे करीत आहेत.
सदर कार्यवाही बाबत मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा.श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड व ईतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा यांचे कौतुक केले आहे.