स्त्रियांसाठी प्रगतीची दारे उघडण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले – डॉ.फरजाना बेगम
नांदेड दि.3भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडून प्रगतीच्या पथावर नेण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. असे प्रतिपादन डाॅ.फरजाना बेगम यांनी केले. त्या कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या बालिका दिन म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. उस्मान गणी होते. प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी बाबासाहेब भुकतरे यांनी केले पुढे डॉ. फर्जाना बेगम म्हणाल्या की, आज स्त्रियांची जी प्रगती झाली आहे ती केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळेच झाल्याचे दिसून येते. कारण त्या काळामध्ये समाजातील प्रस्थापितांचा विरोध झुगारून स्त्री शिक्षणा चे कार्य फुले दांपत्याने केले नसते तर आज महिला चूल आणि मूल यामध्येच सीमित राहिल्या असत्या त्यामुळे प्रत्येक स्त्रीने फुले दांपत्याप्रती कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेख नजीर यांनी केले तर आभार प्रा.मारुती भोसले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा.निजाम इनामदार, प्रा.फराज,प्रा.दानिश,अक्षय हासेवाड, गौस खान पठाण मोहम्मदी बेगम व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका उपस्थित होत्या.