जिला
जानेवारी, पोलीस स्थापना (Raising Day) दिना निमित्त दौडचे आयोजन…..
नांदेड पोलीस दलातर्फे दरवर्षा प्रमाणे या ही वर्षी ‘रेजिंग डे’ साजरा केला जात आहे. दिनांक 02 ते 08 जानेवारी दरम्यान वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याचा भाग म्हणुन आज दिनांक 03 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 07.00 ते 08.00 वा. च्या दरम्यान मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली दौड चे आयोजन करण्यात आले.
सदर दौडला मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी हिरवी झेंडी दाखवुन दौडला सुरूवात करण्यात आली. करीता नांदेड शहरातील सर्व पोस्टेचे पोलीस स्टेशन प्रभारी व शाखा प्रभारी तसेच क्युआरटी, आरसीपी, पोलीस मुख्यालय येथील अंमलदार, तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला होता. सोबतच पोलीस मित्र आणि वेगवेगळया महाविद्यालयाचे तरुण यांनी मोठया संख्येने भाग घेतला होता. सदरची दोड ही पोलीस अधिक्षक कार्यालय येथुन सुरू होवुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा गांधी पुतळा, महाविर चौक, मल्टी पर्पच हायस्कुल समोरून तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड अशा प्रकारे दौड संपन्न झाली.
या प्रसंगी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी दौड मध्ये भाग घेतलेल्या तरूणांना पोलीस भरती बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस भरती ही तुमच्या गुणवतेनुसार होईल. कुणाच्या भुलथापांना बळी पडु नका, कोणी जर तुम्हाला पोलीस भरती बदल गैरसमज करून देत असतील तर प्रत्यक्ष आमचेशी किंवा लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
सदर दौड करीता मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. द्वारकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा, मा. श्री जगदीश भंडरवार, पोनि पोस्टे वजिराबाद, मा. श्री. भगवान धबडगे, पोनि पोस्टे इतवारा, मा. श्री. सुधाकर आडे, पोनि पोस्टे भाग्यनगर, मा. श्री. अनिरूध्द काकडे, पोनि पोस्टे विमानतळ, मा. श्री. संजय ननवरे, पोनि शहर वाहतुक शाखा वजिराबाद, मा. श्री विजय धोंडगे, रापोनि पोलीस मुख्यालय नांदेड, श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड यांनी सहभाग नोंदवला