राष्ट्र निर्मितीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे – आ.जवळगावकर
नांदेड – शिक्षक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांवर घरानंतर सर्वाधिक संस्कार शाळेत होतात. प्रा.शिवकुमार भूरे यांच्या सारखी शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणारे शिक्षक असल्यामुळेच हिमायतनगर परिसरातून अनेक विद्यार्थी घडले. राष्ट्र निर्मितीमध्ये शिक्षकांचे योगदान महत्वाचे असते, असे प्रतिपादन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक शिवकुमार भूरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कार्यगौरव सोहळा आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे हे होते तर व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संतोष पांडागळे, शिराढोण ग्रामपंचायतचे सरपंच खुशाल पांडागळे, सेवानिवृत्त बँक अधिकारी सुदर्शन पांडागळे, गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे, शिवलिंग शिवाचार्य, विकास पाटील देवसरकर, माजी उपसरपंच साईनाथ कपाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, रुक्मिणीनगरचे अध्यक्ष दिलीप पाटील लोहरेकर, राम सूर्यवंशी आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.
आ.जवळगावकर यांनी त्यांच्या भाषणातून प्रा.शिवकुमार भूरे यांच्या शैक्षणिक कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. डॉ.गोविंद नांदेडे यांनी अध्यक्षीय समारोपातून प्रा.शिवकुमार भूरे यांच्या सृजनशिल व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. यावेळी शिवाजी कपाळे, संतोष पांडागळे, खुशाल पांडागळे, सुदर्शन पांडागळे, बालाजी शिंदे, पाध्ये मॅडम यांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी प्राध्यापक शिवकुमार भुरे सर यांचे आजी-माजी विद्यार्थी श्रद्धेने उपस्थित होते.हुतात्मा जयवंतराव पाटील परिवारातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच हिमायतनगर चे सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल सेठ यांच्यासह या कार्यक्रमास वेगवेगळ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
तसेच सेवा जेष्ठ शिक्षक श्रीमान अक्कलवाड सर ,कंठाले सर वराडे सर डॉ.गणेश कदम ,गणेशराव शिंदे , पत्रकार अशोक अनगुलावार् , प्रकाश जैन ,परमेश्वर गोपतवाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा.शिवकुमार भूरे यांचा विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.हा सोहळा देखणा करण्यासाठी संतोष गाजेवार यांच्यासह रुक्मिणीनगर मधील सर्वांनी अनमोल असे सहकार्य केले.